mumbai feriwale 
मुंबई

मुंबई महापालिकेच्या एका चुकीमुळे तब्बल 'इतके' फेरीवाले आले अडचणीत; 'या' योजनेला मुकणार..  

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: मुंबईतील 99 हजार फेरीवाले केंद्र सरकारच्या कर्ज योजनेला मुकाणार आहे.महानगर पालिकेने फेरीवाल्यांकडून कर्जासाठी अर्ज घेताना त्यांच्या बॅंक खात्याची माहिती न घेतल्याने हा पेच निर्माण झाला आहे.

लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर काही आठवड्यातच केंद्र सरकारने फेरीवाल्यांना वार्षिक 7 टक्के दराने 10 हजार पर्यंत कर्ज उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला होता.त्यासाठी सर्व स्थानिक प्रशासनाने केंद्र सरकारने नियमावली पाठवून फेरीवाला धोरणा अंतर्गत सर्वेक्षण झालेल्या फेरीवाल्यांकडून फक्त अर्ज घ्यायचे होते. हे कर्ज केंद्राच्या अंतोद्योय योजने अंतर्गत मिळणार होते. मात्र,महापालिकेने अर्ज घेताना फेरीवाल्याच्या बॅंक खात्याची माहिती घेतली नाही.

हा प्रकार प्रशासनाच्या वेळीच लक्षात आणून दिला होता. मात्र,त्यानंतरही सुधारणा झाली नाही. त्यामुळे आता फेरीवाल्यांना कर्ज मिळण्याची शक्यता कमी आहे.अशी भिती इनटक हॉतर्स युनियनचे सरचिटणीस  सैयद हैदर इमाम यांनी व्यक्त केली.याबाबत माहिती घेण्यासाठी महापालिकेच्या अनुज्ञापन अधिक्षक कार्यालयात संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही. 

योजनेतही घोळ: 

केंद्र सरकार 2017 च्या अंतोद्य योजने अंतर्गत कर्ज उपलब्ध करुन देणारहोते. मात्र,पालिकेने आत्मनिर्भर योजने अंतर्गत अर्ज भरुन घेतले.

86 हजार अर्ज: 

महापालिकेने 1 लाख 26 हजार फेरीवाल्यांचे सर्वेक्षण केले होते.त्यातील 99 हजार फेरीवाल्यांनी अर्ज केला.या 99 हजार फेरीवाल्यांना कर्जासाठी पात्र ठरविणे गरजेचे होते.मात्र,महापालिकेने 86 हजार फेरीवाल्यांना कर्जासाठी पात्र ठरवले.

99 thousand Peddlers will not get loan this time 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi On Paper Leak : पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! पेपरफुटीच्या प्रकरणांची फास्ट ट्रॅक कोर्टात होणार सुनावणी

Ujani Dam: उजनी धरणातील आवक १२,७९७ क्युसेकवर; उपयुक्त पाणीसाठा ५४ टक्के, धरणातून ५,५७० क्युसेक विसर्ग कायम

Latest Marathi Update : बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी जंतर-मंतरवर दाखल

Navi Mumbai Crime: उलवेत विकृतीचा कळस! तरूणांकडून दोन श्वानांवर अत्याचार, प्राणीप्रेमींमध्ये संताप

एका बाजूला विद्यार्थ्यांचं आंदोलन, दुसऱ्या बाजूला धर्मेंद्र प्रधानांची राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांसोबत मोठी बैठक; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT