Worm in Bile Duct
Worm in Bile Duct sakal
मुंबई

Worm in Bile Duct : महिलेच्या पित्त नलिकेत १७ सेंमीचा लांब जंत

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : बॉम्बे रुग्णालयात डॉक्टरांनी महिलेच्या पित्तनलिकेतून १७ सेंटिमीटरचा जंत काढला आहे. डॉक्टरांच्या मते, हे प्रकरण दुर्मिळ आहे. देशात आतापर्यंत ७ ते ८ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण मुंबईत राहणाऱ्या ४५ वर्षीय महिलेला सामान्य पित्तनलिकेत दगड असल्याचे नुकतेच निदान झाले. बॉम्बे रुग्णालयातील डॉक्टरांनी पित्तनलिकेत स्टेंट टाकून एन्डोस्कोपिक प्रक्रिया केली.

यामुळे महिलेला वेदनेपासून आराम मिळाला; परंतु तीन आठवड्यांनंतर रुग्णाला ओटीपोटात तीव्र वेदना होऊ लागल्या. त्यामुळे त्यांनी स्थानिक रुग्णालयात औषधोपचार केले. त्यानंतरही त्यांचा त्रास कमी झाला नाही आणि त्यांनी बॉम्बे रुग्णालयातील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट सल्लागार डॉ. गजानन रोडे यांचा सल्ला घेतला. डॉ. गजानन यांनी सांगितले की, महिलेला गेल्या गुरुवारी बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

यात तिचे रिपोर्ट्सही नॉर्मल आले आहेत. पोटाचे सीटी स्कॅन सीबीडी स्टेंटसह केले गेले आणि पित्तविषयक प्रणालीमध्ये काही संभाव्य गाळ (दगडाचे कण) दिसले. मात्र पोटदुखीचे कोणतेही स्पष्ट कारण सीटी स्कॅनमध्ये आढळून आले नाही.

दगडी कणांच्या शक्यतेमुळे, पित्तनलिकेत टाकलेला स्टेंट काढून टाकण्याचे आणि निचरा करण्याचे नियोजन करण्यात आले. ईआरसीपी (पित्तनलिकेत प्रवेश करण्यासाठी प्रगत एंडोस्कोपी प्रक्रिया) दरम्यान पित्तनलिकातून पांढरा रंगाचा जंत बाहेर येत असल्याचे पाहून आम्हालाही आश्चर्य वाटले. तो पटकन पित्तनलिकेत नाहीसा झाला. मोठ्या कष्टाने आणि वैद्यकीय उपकरणांच्या सहाय्याने पित्तनलिकातून वर्म्स (एस्केरियासिस लुम्ब्रिकोइड्स) यशस्वीरीत्या काढण्यात आले.

...तर काविळीचा धोका

रुग्णाच्या पोटातील जंत यकृतापर्यंत पोहोचला असता, तर रुग्णाला काविळीचा धोका होता, त्याशिवाय तो शरीराच्या कोणत्याही भागात जाऊ शकला असता. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची स्थिती सुधारली आणि प्रक्रियेनंतर त्याच्या ओटीपोटात वेदना बंद झाल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Constituency Lok Sabha Election Result: साताऱ्यात उदयनराजेंनी उडवली कॉलर! पवारांचा बालेकिल्ला अखेर ढासळला

India Lok Sabha Election Results Live : रायबरेलीतून राहुल गांधी विजयी! भाजपच्या 'या' बड्या नेत्याचा केला पराभव

Latur Constituency Lok Sabha Election Result : लातूरने पॅटर्न बदलला ! काँग्रेसचे काळगे आघाडीवर तर भाजपच्या सुधाकर श्रृंगारेंना दणका

Lok Sabha Election 2024 : उत्तरप्रदेशात भाजपाला राम पावला नाही; सर्वात मोठे राज्य भाजपकडून गेले?

Mainpuri Lok Sabha Result: पती-पत्नी एकत्र जाणार संसदेत! अखिलेश यांच्यासह डिंपल यादवही विजयाच्या उंबरठ्यावर

SCROLL FOR NEXT