Crime News Esakal
मुंबई

Crime News: मुंबईत लोकल ट्रेनमध्ये तरुणीवर लैंगिक अत्याचार, परीक्षेसाठी जाताना...

20 वर्षीय तरुणीवर धावत्या ट्रेनमध्ये लैंगिक अत्याचार, आरोपी अटकेत

अंकिता खाणे (Ankita Khane)

मुंबईकरांसाठी महत्वाच्या असलेल्या लोकल ट्रेनमध्ये 20 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चालु लोकल ट्रेनमधील महिला डब्ब्यात आरोपीने तरुणीवर अत्याचार केला आहे. ही घटना काल (14 जून) रोजी सकाळी घडली आहे.

पीडित तरुणी परीक्षेला जात असतानाच तिच्यासोबत ही घटना घडली आहे. आरोपीला संबधित प्रकारानंतर आठ तासात अटक करण्यात आल्याची माहिती जीआरपी अधिकाऱ्यांनी दिली आहे. नवाज करीम (वय 40 वर्षे) आरोपीचे नाव आहे.

हार्बर मार्गावरील मस्जिद बंदर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्थानकादरम्यान बुधवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. पीडित तरुणी मुंबईतील गिरगाव येथील रहिवासी असून बेलापूर याठिकाणी परीक्षेसाठी जात होती.

पीडित तरुणी सीएसएमटी-पनवेल लोकल ट्रेनधील सेकंड क्लास डब्यात प्रवास करत असताना मुलगी एकटीच असल्याचा फायदा घेत आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यावेळी तरुणीने स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला. तिने आरडाओरडा सुरु केल्यानंतर आरोपीने मस्जिद बंदर स्थानकावर पळ काढला.

दरम्यान तरुणीने रेल्वे सुरक्षा दलाकडे तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरपीएफ, जीआरपी, क्राईम ब्राँच आणि मुंबई पोलिसांनी पथकं तयार करुन आरोपींचा शोध सुरु केला. पोलिसांनी मस्जिद बंदर स्थानकात बसवलेले सीसीटीव्ही फूटेज तपासून त्या व्यक्तीची ओळख पटवुन घटनेनंतर आठ तासात बेड्या ठोकल्या आहेत.

या घटनेनंतर मायानगरीत महिला सुरक्षित आहेत का असा प्रश्न निर्माण झाला आहे. रात्री सुरक्षिततेसाठी महिलांच्या डब्यात पोलीस तैनात असतात. परंतु या घटनेनंतर लोकल ट्रेनमधील महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न उभा राहीला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लावणीची लय, अभिनयाची जादू अन् अजरामर भूमिका; मधू कांबीकर यांची एक्झिट, मराठी कलाविश्वावर शोककळा

VIRAT KOHLI : विराट कोहलीच्या टेस्ट निवृत्तीला अजित आगरकर जबाबदार? ‘ज्या पद्धतीने त्याच्याशी वागलं...’ माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य

Kolhapur Ambabai Temple : नवरात्रोत्सवाच्या धामधुमीत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवा वाद; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक; नेमका वाद काय?

SA vs AUS 1st Test: व्हॉट अ कॅच...! स्टीव्ह स्मिथची चतुराई अन् आफ्रिकन फलंदाजचा करेक्ट कार्यक्रम; ऑसी खेळाडूचा विश्वविक्रम Video

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

SCROLL FOR NEXT