Mumbai BJP Office Fire: esakal
मुंबई

Mumbai BJP Office Fire: मुंबईतील भाजप कार्यालयाला भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

Mumbai BJP Office Fire: देशात लोकसभेच्या निवडणुका सुरु असताना मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयाला आग लागली आहेय

Sandip Kapde

मुंबईतील नरीमन पॉइंट येथील भाजप कार्यालयाला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. किचनमध्ये वेल्डिंगच काम सुरु असताना ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहे.  Mumbai BJP Office Fire

मुंबईतील नरिमन पॉइंट येथे भाजपचे प्रदेशा कार्यालय आहे. येथून राज्यभरातील भाजप संघटनेचे काम पाहिल्यात. आज कार्यालयात डागडुजीचे काम सुरु होते. यावशी शॉर्टसर्किट होवून आग लागली.  या कार्यालयात बड्या नेत्यांच्या पक्षप्रवेशाचेही कार्यक्रम होत असतात.

आग लागल्यानंतर धुराचे लोट हवेत पसरत होते. त्यामुळे उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये एकच धावपळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरु आहे.

आज दुपारी 4.35 च्या सुमारास ही आग लागली. ऑफिसमध्ये कागदपत्रे आणि लाकडी फर्निचर असल्याने आगीने अधिकच पेट घेतला आणि त्यामुळे धुराचे लोटही पसरले. आज रविवार असल्याने कार्यालयाला सुट्टी होती पण या कार्यालयातून सोशल मीडियाचं काम चालतं. त्यामुळे तेवढेच कर्मचारी कार्यालयात होते. आग लागल्यामुळे सर्व कर्मचारी कार्यालयाच्या बाहेर पडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT