knife attack sakal media
मुंबई

डोंबिवली: पत्नीवर चाकू हल्ला, स्वतःवरही गोळी झाडण्याचा प्रयत्न; दुसरा गुन्हा दाखल

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : पत्नीवर भर रस्त्यात चाकूने हल्ला (knife attack on wife) केल्यानंतर स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न (suicide attempt) करणाऱ्या सोमनाथ देवकर (culprit somnath devkar) याची प्रकृती आता स्थिर आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया करीत गोळी काढण्यात आली असून सध्या रुग्णालयात पुढील उपचार सुरु आहेत. बेेकायदा देशी बनावटीचे पिस्तुल जवळ बाळगल्याप्रकरणी (deshi revolver) तसेच आत्महत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी त्याच्यावर रामनगर पोलिस ठाण्यात दुसरा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

डोंबिवली पूर्वेत राहणाऱ्या देवकर याने घरगुती वादातून पत्नीवर भर रस्त्यात चाकूने वार करत तिला गंभीर जखमी केले होते. त्यानंतर फरार असलेला सोमनाथ हा रविवारी सकाळी रहात्या घरी आला होता. त्याने स्वतःवर गोळी झाडत आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांना याची माहिती मिळताच त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

त्याच्यावर शस्त्रक्रीया करीत गोळी काढून टाकण्यात आली असून त्याची प्रकृती आता स्थिर असून, तो ठिक झाल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात येईल अशी माहिती रामनगर पोलिसांनी दिली. दरम्यान रामनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक गणेश जाधव यांच्या फिर्यादीवरुन सोमनाथ याच्यावर बेकायदा देशी बनावटीचे पिस्तुल जवळ बाळगल्याप्रकरणी तसेच आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSMT-Sawantwadi Express : स्वच्छतागृहात सांडपाणी अन् फुटलेल्या काचांवर पुठ्ठे; सावंतवाडी एक्स्प्रेसच्या पहिल्याच प्रवासातील दुरवस्थेचा व्हिडिओ व्हायरल, ट्रेनमधील धक्कादायक वास्तव समोर

Parbhani food Safety Raid: परभणीत अन्न सुरक्षा विभागाचा छापा; पेढीचा परवाना निलंबित, २१५ किलो मिल्क पावडर जप्त

Marathi News Live Updates : कमीत कमी प्रदूषण अन् शक्य तितक्या पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करू : मुख्यमंत्री फडणवीस

EPFO Marriage Withdrawal Rule : PF खातेदारांसाठी मोठी बातमी! लग्नासाठी खात्यातून मधून पैसे काढायचे आहेत? जाणून घ्या EPFOचा नवा नियम

MPSC Success Story: शेतकरी कुटुंबातील तरुणाची कमाल! दोनदा अपयश, ०.२५ गुणांनीही हुकली परीक्षा; तरी जिद्द सोडली नाही, इरफान शेखने मिळवली सलग दुसरी सरकारी नोकरी

SCROLL FOR NEXT