Accident in Mumbai Sakal
मुंबई

Video: भिंतीला धडकून दुचाकीस्वाराचा अपघात; दुचाकीसह पडला नाल्यात

काळोखात भिंत न दिसल्याने तरूण दुचाकीसह नालात पडला.

सकाळ डिजिटल टीम

मालाड, मालवणीतील गेट क्रमांक 6 येथील रस्त्याच्या बाजूला असलेल्या भींतीला धडकून दुचाकीस्वार नाल्यात पडला. 25 मार्च रोजी रात्री 8.15 च्या सुमारास हा अपघात घडला. रस्त्यावरून ये जा करणाऱ्या पादचाऱ्यांनी दुचाकीस्वाराला नाल्याच्या बाहेर काढले. या अपघातामध्ये दुचाकीस्वार जखमी झाला आहे.

शुक्रवारी रात्री 8.15 वाजता नाल्यालगतच्या नवीन रस्त्यावरून जात असताना काळोखात भिंत न दिसल्याने तरूण दुचाकीसह नालात पडला. मालाड, मालवणीतील गेट क्रमांक 6 येथे ही घटना घडली. सुदैवाने दुचाकीस्वाराला कोणतीही मोठी दुखापत झाली नाही. रस्त्यावरून ये जा करणाऱ्या पादचाऱ्यांनी त्याला नालातून बाहेर सुखरूप काढले.(A two-wheeler crash into a wall; Fell into a ditch with a two-wheeler)

या आधीही अशा घटना घडल्या आहेत, मात्र पालिकेने दुर्लक्ष केलं आहे. ही भींत इथे नेमकी का बांधली गेली आहे याबद्दल स्पष्टता नाही. तिथे लोखंडी बॅरिकेट आणि सूचना फलकही लावलेले नाहीत. या नाल्यावर नवीन रस्त्यालगत तसेच शहीद अब्दुल हमीद रस्त्यावर असलेल्या पुलाची भिंत संपुर्ण तुटलेली आहे आणि तेथून मालवणीत हजारो वाहने दिवसभरात ये जा करतात. गेली अनेक वर्षांपासून येथील भिंत तुटली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT