मुंबई

शिवसेनेच्या बालेकिल्ल्याचा 'आदित्य'च किल्लेदार | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा

आदित्य ठाकरे यांचा वरळी मतदार संघातून विजय झालाय. तब्बल 79000 मतांनी आदित्य ठाकरे वरळीमधून निवडून आलेत. आदित्य ठाकरे ठाकरे घराण्यातील निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे पहिले ठाकरे आहेत. 

वरळी मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघात 1,49,067 पुरुष तर 1,16,024 महिला असे एकूण 2,65,091 इतके मतदार आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर मुंबईतील सर्वाधिक ऑफलाईन नोंदणी होणारा मतदारसंघ वरळी हाच होता

यावेळी शिवसेना-भाजपची युती झाली, मनसेने आपला उमेदवार दिला नाही तर विरोधकांनी ही या मतदारसंघात थोडा 'ढिल' दिल्याने आदित्य ठाकरेंसमोर आव्हान उभे राहीलेच नाही. यामुळे शिवसेनेच्या बाजूने एकतर्फी झाली असंच म्हणावं लागेल. तशीच रणनीती शिवसेनेने आखली होती. यात तडका काय तो दिला तो फक्त अभिजित बिचकुले यांच्या उमेदवारीने.

मतदानात घट :

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या उमेदवारीमुळे राज्यात सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या वरळी मतदारसंघात मतदानाचा टक्का घसरला आहे. 2014 रोजी या मतदारसंघात 55.75 टक्के लोकांनी मतदान केलं होतं तर यावेळी ही टक्केवारी 50.20 वर आली असल्याने गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी मतदानाच्या टक्केवारीत 5.55 टक्‍क्‍यांची घसरण झाली आहे.

दाक्षिणात्य पेहरावावरुन आदित्य ठाकरे ट्रोल

अमराठी भाषेत होर्डिंग लावल्यामुळे आदित्य ठाकरेंना ट्रोल करण्यात आलं. त्याचबरोबर दाक्षित्य पेहरावात प्रचार करणाऱ्या आदित्य ठाकरे यांना नेटकऱ्यांनी 'हटाव लूंगी बजाव पुंगी'ची आठवण करुन दिली आहे.

वरळीतून आदित्य ठाकरे यांची उमेदवारी जाहीर झाल्यावर या परिसरात गुजरातीसह अनेक अमराठी भाषेतील होर्डिंग लावण्यात आले. त्यात 'केम छो वरळी' या गुजराती भाषेतील होर्डिंगवर तर प्रचंड टिका झाली होती. या टिके मुळे होर्डिंग हटवण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही वरळीतील प्रचारात आदित्य ठाकरे यांनी लुंगी आणि पांढरा शर्ट असा दाक्षिणात्य पेहराव परीधान केलेला पाहायला मिळाला. त्यावरुनही आदित्य यांना सोशल मिडियावर पुन्हा ट्रोल केलं गेलं.

WebTitle : aaditya thackeray won from worli vidhansabha constetuency

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : काय चाललंय? धबधब्याखाली दोन मुले आक्षेपार्ह अवस्थेत, लोकांच्या माना लाजेने खाली, सार्वजनिक ठिकाण तरी सोडा रे...

Chakan MIDC : चाकण एमआयडीसी परिसरात वर्तुळाकार बससेवा, पीएमपी प्रशासनाचा निर्णय; अध्यक्षांकडून पाहणी

Vlogger of the Year: लोहार यांचा व्लॉगर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मान

Indrayani River : ‘इंद्रायणी-पवना सुधार’ निविदेसाठी सल्लागार, चार महिन्यांत कार्यवाहीनंतर काम सुरू होणार; ‘पीएमआरडीए’ची माहिती

Solapur: डॉ. शिरीष वळसंगकर प्रकरणी डॉ. उमा वळसंगकरांचा मनीषा मानेंविरुद्ध नवा अर्ज; आर्थिक अपहारप्रकरणी गुन्हा दाखल करा

SCROLL FOR NEXT