BMC sakal media
मुंबई

आरे वसाहतीत रस्ते सुधारणा करताना वृक्षतोड होणार नाही - मुंबई महापालिका

मिलिंद तांबे

मुंबई : महानगरपालिकेच्या (bmc) वतीने रस्ते विभागामार्फत आरे वसाहतीत (aare colony) पश्चिम द्रुतगती मार्ग ते मोरारजी नगर पर्यंतच्या रस्त्याची सुधारणा (Road repairing) करण्यात येणार आहे. सदर काम करताना रस्त्याची रुंदी वाढविण्याचे कोणतेही नियोजन नाही तसेच सदर काम करताना कोणतीही वृक्षतोड (tree cutting) होणार नाही, असे स्पष्टीकरण मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

आरे कॉलनीतील मुख्य रस्त्याचे रुंदीकरण होणार असून त्यामुळे वन संपदेला हानी होवू शकते असा आरोप केला जात आहे. संबंधित वृत्तामध्ये कोणतेही तथ्य नाही असे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. महानगरपालिकेच्या रस्ते विभागातर्फे, आरे कॉलनीतील पश्चिम द्रुतगती मार्गापासून मोरारजी नगर पर्यंत रस्त्याचे सध्याच्या उपलब्ध रुंदी इतकेच सिमेंट कॉंक्रिटीकरण करण्यासाठी निविदा मागविण्यात आली आहे. त्यामध्ये रुंदी वाढविण्याचे कोणतेही नियोजन नाही.

सिमेंट काँक्रिटीकरण केल्याने खड्डा मुक्त रस्ता उपलब्ध होऊ शकणार आहे. रस्ता सुधारणा करताना कोणतेही झाड कापले जाणार नाही. त्यामुळे आरे वसाहत परिसरातील वनसंपदा याला कोणतेही नुकसान होणार नाही, याची पुरेपूर काळजी महानगरपालिका प्रशासनाने घेतली आहे. मुख्य वनसंरक्षक यांच्या निर्देशानुसार आवश्यक ती उपाययोजना देखील प्रशासनाने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crop Insurance: दुष्काळ जाहीर झाला! पीक विम्यासाठी काय करावं? किती पैसे मिळणार? पाहा संपूर्ण गणित

Asian Games 2026: अरे आवाजsss कुणाचा... भारतीय पुरुष कबड्डी संघाने जिंकले नववे सुवर्णपदक; रोमहर्षक लढतीत इराणवर विजय

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर पुन्हा अपघात! थांबलेल्या टँकरला धडकून कारचा चुराडा, एकाचा मृत्यू

Dattatray Bharne Drought Relief : महाराष्ट्रातील दुष्काळावर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे काय म्हणाले? किती टप्प्यात मदत करणार?

पुण्यात पोलिसाने गोळी झाडून घेत आयुष्य संपवलं, PMPLच्या बस डेपोत आढळला मृतदेह; ३ दिवसांपासून होते बेपत्ता

SCROLL FOR NEXT