मुंबई

संभाजीराजेंना अभिजीत बिचुकलेंचा सल्ला; म्हणाले, 'सातारच्या गादीचा वारस...'

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: मराठा आरक्षणासह समाजाच्या इतर मागण्यांसाठी छत्रपती संभाजीराजे (Yuvraj Sambhaji Raje Chhatrapati) मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाला बसले आहेत. युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या मागण्यांना आमचे पूर्ण समर्थन आहे आणि आम्ही त्यांना पाठिंबा देतो, असे ट्विट विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी केले आहे. दुसरीकडे बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी देखील संभाजीराजेंच्या या उपोषणाबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

अभिजीत बिचुकले यांनी म्हटलंय की, सातारच्या गादीचा वैचारिक वारस मीच आहे. त्यामुळे बारा बलुतेदारांना एकत्र घेऊन काम करण्याचा मी प्रयत्न करत असतो. आम्ही मराठाच आहोत म्हणता ना, मग आम्हाला आरक्षण का देत नाही? असा सवालही त्यांनी केला आहे.

पुढे त्यांनी संभाजीराजेंना सल्ला दिलाय की, कोपर्डी प्रकरणी भगिनीला न्याय मिळालाच पाहिजे. त्यासाठी आपण एकत्र लढूयात. सुप्रीम कोर्टात याचा लढा लढू. मात्र तुम्ही शरीराला त्रास करून घेऊ नका, अशी कळकळीची विनंतीही बिचुकले यांनी केली आहे. पुढे एक महत्त्वाचं विधान करत अभिजीत बिचुकले यांनी म्हटलंय की, आपणच जाती पाडल्या आहेत. त्यामुळे आपण सगळे मिळून आता काम करूया.

आज या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी शिवसेनेचे नेते आझाद मैदानात आला होते. मात्र यावेळी त्यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले. खासदार अनिल देसाई, महापौर किशोरी पेडणेकर आणि अरविंद सावंत हे संभाजी राजे यांची भेट घेण्यासाठी आले. मात्र यावेळी आझाद मैदानात बसलेल्या मराठा तरुणांनी जोरदार घोषणाबाजी केली. अखेर संभाजी राजे यांना स्वतः उभे राहून कार्यकर्त्यांना शांत करावे लागले. तर महापौर आणि खासदार यांनी आम्ही त्वरित उद्धव ठाकरे यांच्या कडे जाऊन मार्ग काढतो असे मराठा बांधवांना सांगावे लागले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेत्याचे एका दिवसात दोन पक्षप्रवेश, आधी शिंदे गटात मग ठाकरे गटात; काय आहे प्रकरण?

Poha Idali: सकाळच्या नाश्त्यात बनवा चवदार पोहा इडली, जाणून घ्या रेसिपी

Yogi Adityanath : जगाला शांतता संदेश देणाऱ्या सनातन परंपरेचा काँग्रेसनं अपमान केलाय, त्याचं अस्तित्व नाकारलंय; योगींचा घणाघात

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 02 मे 2024

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT