crime news esakal
मुंबई

इन्स्टाग्रामवर तरुणींना फसवणारा वसईचा ब्लॅकमेलर अखेर जेरबंद

पोलिसांनी कॅब चालक बनून सापळा लावला आणि गोखिवरे येथून त्याला अटक केली.

सकाळ डिजिटल टीम

वसई: मुलींना इन्स्टाग्रामवर (Instagram) मॉडेल बनवण्याची आॅफर देणाऱ्या अबू सलीम रेहमान अन्सारी (१९) याला आज वसई पोलिसांनी (Vasai Police)अटक केली.आतापर्यंत त्याने ७ मुलींना अशाप्रकारे जाळ्यात ओढल्याचे समोर आले आहे. वसईत राहणार्‍या २३ वर्षीय तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून आज पोलीसांनी फिल्मी स्टाईलने त्याला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार,

आरोपी अबू सलीम हा साराह वर्मा (Sarah vermaa) या नावावरून इन्स्टाग्रामवरून मुलींशी संपर्क करायचा आणि मॉडेलिंगची ऑफर द्यायचा. त्यानंतर प्युमा (Puma) कंपनीचा अधिकारी हर्ष बनून तो मुलींशी बोलायचा. त्याचे इंग्रजी चांगले असल्याने त्याच्या बोलण्याला मुली फसायच्या. वसईत राहणार्‍या २३ वर्षीय तरुणीला त्याने ५ हजार रुपये घेऊन लॉजवर बोलावले होते. त्यासाठी कॅब बुक केली होती. पोलिसांनी कॅब चालक बनून सापळा लावला आणि गोखिवरे येथून त्याला अटक केली.

अबू सलीम रेहमान अन्सारी हा तरुण वसईत (Vasai) राहतो. त्याने मुलींना ब्लॅकमेल करून खंडणी उकळण्यासाठी इन्स्टाग्रामवर नव्या चेहर्‍यांची गरज आहे असे सांगून मॉडेलिंगची (Modeling) ऑफर द्यायचा. प्रसिध्दी आणि पैसा याला भूलून या मुली तयार व्हायच्या. मग या मुलींशी व्हॉटसॲप चॅट (Whatsapp Chat) करायचा. त्यांना अश्लील चॅट (सेक्स चॅट) करण्यास उद्युक्त करायचा आणि त्याचे रेकॉर्डिंग करून ब्लॅकमेल करायचा. पैसे दिले नाहीत तर या अश्लील चित्रफिती वायरल करायच्या धमकी देऊन पैसे आणि एक रात्र सोबत घालविण्याची मागणी करायचा. वसईत राहणार्‍या २३ वर्षीय तरुणीला त्याने अशाच प्रकारे आपल्या जाळ्यात ओढले होते. या तरुणीने वसई पोलीस ठाण्यात (Vasai Police Station) तक्रार दिली होती. त्या तक्रारीनंतर पोलिसांनी सापळा लावून त्याला अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेतकऱ्यांना उजनीचे सलग ८० दिवस पाणी! धरणाचे ९ दरवाजे उघडले; उन्हाळी आवर्तनासाठी लागणार १७ टीएमसी, धरण ५७ टक्के भरलेले, वाचा...

Bidkin News : बिडकीन हादरले! विहिरीत बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांसमोरच घडली दुर्दैवी घटना

Pune Crime : गुंतवणूकदारांची फसवणूक; भाजपचा नेता शेखर चरेगावकरला अटक

Dapoli News : कोकण दीपकाडीला जागतिक व्यासपीठ; संवर्धनासाठी जनतेला मतदानाचे आवाहन

Central Railway: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! आठवड्याच्या मध्यातच मुंबई लोकलवर पॉवर ब्लॉक; कधी आणि कुठे? वाचा...

SCROLL FOR NEXT