AC Local Train Ticket Rate saka
मुंबई

मुंबईकरांना मोठा दिलासा, AC रेल्वेच्या दराबाबत दानवेंची मोठी घोषणा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : उष्णतेच्या लाटेमुळे मुंबईकर देखील हैराण आहेत. पण, एसी लोकलच्या ज्यादा दरामुळे प्रवास परवडत नाही. पण, आता मुंबईकरांना एसी लोकलच्या दराबाबत मोठा दिलासा मिळणार आहे. तिकीटांच्या दरामध्ये ५० टक्के घट (AC Local Train Ticket Rate) करण्याची घोषणा मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केली आहे. त्यांनी आज भायखळा रेल्वे स्थानकाला भेट दिली. यावेळी ते बोलत होते.

मुंबईसाठी लोकल ही लाईफलाईन आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वेनं त्यामध्ये सुधारणा करत एसी लोकल सुरू केली. पण, एसी लोकलचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याची तक्रार वारंवार प्रवाशांकडून केली जात होती. त्यामुळे एसी लोकलला प्रतिसाद देखील मिळत नव्हता. याबाबत मध्ये रेल्वेकडून ५ हजार प्रवाशांचं सर्वेक्षण करण्यात आलं होतं. यावेळी जवळपास ९८ टक्के प्रवाशांनी एसी लोकलचे दर कमी करण्याची मागणी केली होती. आता एसी लोकलच्या दरात घट केल्यामुळे सर्वसामान्यांना देखील एसी लोकलच्या प्रवासाचा आनंद घेता येणार आहे.

अहमदनगरपासून बीडपर्यंत नवीन रेल्वे मार्ग तयार करण्यात येत आहे. तसेच नाशिकपासून पुण्यापर्यंत मार्गाच्या कामाला आता नीती आयोगाने परवानगी दिली आहे, असंही रावसाहेब दानवे यांनी सांगितलं आहे.

फडणवीसांनी मानले आभार -

दरम्यान, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एसी लोकलचे दर कमी केल्यामुळे रावसाहेब दानवे यांचे आभार मानले. केंद्र सरकारने मुंबईकरांना मोठा दिलासा दिला आहे. त्याचप्रमाणे आता राज्य सरकारने व्हॅट कमी करून इंधनदरवाढीपासून जनतेला दिलासा द्यावा, असं फडणवीस म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT