redevelopment of old societies sakal
मुंबई

Housing Redevelopment : मुंबईतील गृहनिर्माण स्वयंपुनर्विकासाला गती

प्रबोधनकार ठाकरे नगर चारकोप, कांदिवली येथील 'राकेश' सहकारी गृहनिर्माण संस्थेचा स्वयंपुनर्विकासांतर्गत भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - प्रबोधनकार ठाकरे नगर चारकोप, कांदिवली येथील 'राकेश' सहकारी गृहनिर्माण संस्थेचा स्वयंपुनर्विकासांतर्गत भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. शनिवार, २७ मे २०२३ रोजी सकाळी १० वाजता हा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. मुंबई बँकेचे अध्यक्ष आणि विधानपरिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांच्या हस्ते हा भूमिपूजन सोहळा होणार आहे.

१४ मे रोजी गोरेगाव येथील नेस्को हॉल येथे मुंबईतील गृहनिर्माण सहकारी संस्थांची परिषद पार पडली. या परिषदेला गृहनिर्माण संस्थांच्या सभासद, प्रतिनिधिंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद दिला. या परिषदेत मुंबईतील गृहनिर्माण प्रकल्प, स्वयंपुनर्विकास प्रकल्पाना चालना देण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारने अनेक महत्वाचे निर्णय जाहीर केले.

याच परिषदेत मुंबई बँकेला नोडल एजन्सी जाहीर केल्यामुळे स्वयंपुनर्विकासासाठी अनेक गृहनिर्माण संस्थांनी मुंबई बँकेकडे संपर्क साधला. त्याचाच एक भाग कांदिवली (पश्चिम) येथील 'चारकोप राकेश' गृह संकुलाने स्वयंपुनर्विकासांतर्गत पुनर्बांधणीचे काम हाती घेतले आहे.

या प्रकल्पाला एकूण खर्च ४७.८१ कोटी येणार असून मुंबई जिल्हा मध्यवर्ती बॅंकेकडून १० कोटी मंजूर करण्यात आले आहेत. या भूमिपूजन सोहळ्याला खासदार गोपाळ शेट्टी, आमदार सुनील राणे, मुंबई हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर यांच्यासह मुंबई बँकेच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Walmik Karad: वाल्मिक कराडला दुसऱ्या तुरुंगात हलवणार का? दोषमुक्तीच्या अर्जाचं काय झालं? उज्ज्वल निकमांनी सविस्तर सांगितलं

Video: किती हा निर्दयीपणा! मनोरंजनासाठी मालकाने नोकरावर सोडला सिंह, भयानक व्हिडिओ व्हायरल

"नातेवाईक जेवण जमिनीवर टाकून खायला सांगायचे" या मराठी अभिनेत्रीचं हलाखीत गेलं बालपण; "जुने कपडे.."

Latest Maharashtra News Updates : लोकांच्या घरी होळ्या पेटवून पोळ्या भाजण्याचा भाजपाचा धंदा - उद्धव ठाकरे

WTC 2025-27 ची ऑस्ट्रेलियाकडून दणक्यात सुरूवात! पहिले दोन्ही सामने जिंकत भारत-इंग्लंडला दिलं टेन्शन

SCROLL FOR NEXT