मुंबई

पोलिसांच्या हातावर तुरी देऊन ड्रग्सप्रकरणी अटकेत असलेला कोरोना पॉझिटिव्ह आरोपी छोटू वर्मा पळाला

सुमित बागुल

मुंबई : मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी समोर येतेय. मुंबईतील कोविड रुग्णालयातून ड्रग्स प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीने कोरोना हॉस्पिटलमधून पलायन केलं  आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा आरोपी कोरोना पॉझिटिव्ह आहे. ड्रग्स प्रकरणी अटक केल्या गेलेल्या छोटू वर्माने मुंबईतील जेजे रुग्णालयातून पलायन केलं आहे. 

काही दिवसांपूर्वी मुंबईतील भायखळा पोलिसांनी छोटू वर्मा या आरोपीला ड्रग्स प्रकरणी अटक केली होती. छोटू वर्मावर ड्रग्सची तस्करी करण्याचे गंभीर आरोप आहेत. छोटू वर्माला कोर्टात हजार देखील केलं जाणार होतं. मात्र प्रोटोकॉल आणि प्रोसेस प्रमाणे छोटू वर्माची मेडिकल केली गेली. त्याची कोरोना चाचणी देखील केली गेली. या मेडिकल टेस्टमध्ये आणि कोविड टेस्टमध्ये छोटू वर्मा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं होतं.

कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोपी छोटू वर्मा याला मुंबईतील जे जे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. वॉर्ड नंबर ५ मध्ये छोटू वर्माला ठेवलं होतं. समोर येणाऱ्या माहितीनुसार छोटू वर्मा याने संधी साधून रुग्णालयातून पळ काढलाय. धक्कादायक बाब म्हणजे छोटू वर्मा हा अजूनही कोरोना पॉझिटिव्ह आहे. कोरोना पॉझिटिव्ह असून छोटू पळून गेल्याने चिंतेचं वातावरण झालंय. 

accused chotu verma ran from j j hospital and he is corona positive

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Meat Incident: दारूच्या नशेसाठी माणुसकी संपली! कुत्र्याला मारलं अन् ‘सशाचं मांस’ म्हणून विकलं... गावात घडलं भयानक कृत्य

Latest Marathi News Live Update : काँग्रेससोबत आघाडी होणार नाही, वंचितकडून मोठी घोषणा

साक्षीसोबत रोमान्स करताना सचिनला रंगेहात पकडणार अर्जुन; बहिणीच्या नवऱ्याचे कारनामे पाहून होणार रागाने लाल

हृतिक रोशनचा मुलांसोबत भन्नाट डान्स, वडिलांसारखी पोरं पण काही कमी नाही, व्हिडिओ व्हायरल

Karad Accident: डंपरच्या धडकेमध्ये सैदापूरला निवृत्त शिक्षक ठार; पत्नी गंभीर जखमी, पाठी मागून जाेराची धडक!

SCROLL FOR NEXT