अलिबाग : महसूल विभागाच्‍या कारवाईत सहभागी झालेले ग्रामस्‍थ.
अलिबाग : महसूल विभागाच्‍या कारवाईत सहभागी झालेले ग्रामस्‍थ. 
मुंबई

बेकायदा माती उत्‍खननाचा उधळला डाव

सकाळ वृत्तसेवा

अलिबाग : वळवली येथील गुरचरण जागेत बेकायदा माती उत्खनन व वाहतूक सुरू होती. या माती उत्खनन व वाहतुकीवर अलिबागच्या महसूल विभागाने मंगळवारी पहाटे कारवाई केली. ही कारवाई वळवली येथील ग्रामस्थांच्या पुढाकाराने करण्यात आली.

वळवली गावापासून दोन किलोमीटरवर सर्व्हे क्रमांक 82 मधील सुमारे 35 हेक्‍टर क्षेत्रामध्ये सरकारी गुरचरण जागा आहे. या जागेला लागूनच वन विभागाची जागादेखील आहे. गुरचरण जागेतील मातीमाफिया जेसीबीच्या साह्याने माती उत्खनन करून त्याची रेवदंडा, आग्राव परिसरात ट्रकने पोहचवण्याचे काम सुरू होते. अलिबाग तहसील कार्यालयाची परवानगी न घेता या जागेतील माती खुलेआमपणे रात्रीच्या वेळी खोदाई करून चोरून नेली जात होती. याबाबत महसूल व वन विभाग अनभिज्ञ होते. 

रात्रीच्या वेळी जेसीबीच्या माध्यमातून मातीउत्खनन होत असल्याचा त्रास वळवली येथील ग्रामस्थांना होऊ लागला. या ग्रामस्थांनी पुढाकार घेत पहारा ठेवून पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास मातीने भरलेला ट्रक अडवला. ट्रकचालक मदन पवार याला पकडून ठेवण्यात आले. त्यानंतर ग्रामस्थांनी माती खोदाईच्या ठिकाणी धाव घेतली. 
त्या ठिकाणी जेसीबीच्या मदतीने माती उत्खनन सुरू होते.

जेसीबीचालक रमेश गुप्ता यालासुद्धा पकडून ठेवण्यात आले. त्यानंतर ग्रामस्थांनी तलाठी काटकर यांना बोलावले. या घटनेची माहिती मिळताच अलिबाग तहसील कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार अजित टोलकर व तलाठी अविनाश काटकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. अवैध माती वाहतूक करणारा ट्रक, माती उत्खनन करणारा जेसीबी ताब्यात घेऊन खोदाई केलेल्या जागेची पाहणी करून पंचनामा केला. 

माती माफियांनी सरकारचे सर्व नियम धाब्यावर बसवून गुरचरण जागेतील 200 ब्रास माती चोरून नेली. सुमारे सात लाख रुपयांची माती चोरून नेल्याचे अलिबाग तहसील कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. संबंधित माती उत्खनन करणारे व वाहतूक करणाऱ्या मालकांना नोटिसा बजावून त्यांच्याविरोधात ठोस कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार अजित टोलकर यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT