Pet Dog Sakal
मुंबई

Mumbai News : सार्वजनिक ठिकाणी घाण करणा-या श्वानांच्या मालकांवर होणार कारवाई; पालिका आकारणार दंड

रस्ते व सार्वजनिक ठिकाणी विष्ठा उत्सर्जन करणा-या पाळीव श्वानांच्या मालकांवर कारवाई तीव्र केली जाणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - रस्ते व सार्वजनिक ठिकाणी विष्ठा उत्सर्जन करणा-या पाळीव श्वानांच्या मालकांवर कारवाई तीव्र केली जाणार आहे. संबंधित मालकांनी आपल्या श्वानांच्या विष्ठेची विल्हेवाट लावली नाही तर पालिका मालकांकड़ून ५०० रुपये दंड वसूल केला जाणार आहे.

श्वानांची मल, विष्ठा उचलता येईल त्यासाठी पालिकेने काठीसारख्य़ा उपकरणाचा वापर करण्याचेही सूचवले आहे. या उपकरणाद्वारे ते सहजरित्या फेकता येईल असे उपकरण असणार आहे.

मुंबईच्या सुशोभिकरणावर महापालिकेकडून १७०० कोटी रुपये खर्च केले जाते आहे. फूटपाथ, दुभाजक, समुद्रकिनारे, उद्याने, भिंती, हेरिटेज वास्तू यांचे सुशोभीकरण केले जात आहे. पालिकेने शहरातील स्वच्छतेवर भर दिला आहे. त्यामुळे पाळीव प्राण्यांना बाहेर फिरायला आणताना मालकांकडून श्वानांच्या मलविसर्जनाची (विष्ठा) विल्हेवाट लावली जात नाही.

त्यामुळे शहर अस्वच्छत होते. त्यामुळे रस्ते, सार्वजनिक ठिकाणी श्वानांच्या मलम मूत्राची (विष्ठा) विल्हेवाट मालकांनी लावली पाहिजे. पालिकेने यासाठी कारवाई तीव्र केली जाणार असून, दुर्लक्ष करणा-या श्वानांच्या मालकांवर ५०० रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे.

सार्वजनिक ठिकाणे, रस्ते वा पदपथांवर अनेक श्वान मालक किंवा संबंधित 'केअर टेकर' हे आपल्या घरातील पाळीव प्राण्याला घेऊन फिरायला येत असतात. अशावेळी अनेकदा रस्त्यावर, पदपथावर वा सार्वजनिक ठिकाणी हे प्राणी विष्ठा उत्सर्जन करतात.

यामुळे सार्वजनिक ठिकाणे अस्वच्छ होऊन आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे शहर स्वच्छ राहण्याच्यादृष्टीने पालिकेने याकडे लक्ष वेधले आहे. पाळीव प्राणी मालकांनी कोणत्याही प्रकारे पाळीव प्राण्यांच्या विष्ठेची विल्हेवाट लावली पाहिजे. ही विष्ठा उचलून योग्य ठिकाणी फेकण्यासाठी के-पश्चिम विभागाकडून एक काठी सारख्या उपकरणाचा उपयोग करण्याचे सुचवले आहे.

दुकानातून ५०० रुपयांमध्ये हे उपकरण मिळते. पालिकेकडुन सुशोभीकरण आणि स्वच्छतेवर हजारो कोटी रुपये खर्च करत आहे. त्यामुळे लोकांनीही पालिकेला सहकार्य करावे. याकडे दुर्लक्ष झाल्यास घनकचरा व्यवस्थापनाच्या नियमांनुसार संबंधित मालकांवर दंड आकारला जाईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Chaturthi: गणेश चतुर्थीआधी महाराष्ट्रात हाय अलर्ट! गुप्तचर संस्थांचा इशारा, मुंबई पोलिसांची मोठी तयार

Mumbai News: गणेशोत्सवाच्या सुट्टीत खुलं राहणार 'जिजामाता उद्यान', पण या दिवशी बंद; वाचा सविस्तर

Latest Marathi News Updates: बीडच्या गेवराईत हाके आणि विजयसिंह पंडितांचे कार्यकर्ते आमनेसामने

PM Narendra Modi: ''पंतप्रधान मोदींच्या 'डिग्री'चे तपशील सार्वजनिक करण्याची गरज नाही'', दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय

Mumbai Politics: निवडणुकीच्या तोंडावर राजकीय खलबतं! शिंदेसेनेत मोठी इनकमिंग, शरद पवारांसह राज ठाकरेंना धक्का

SCROLL FOR NEXT