Adani-Airports
Adani-Airports 
मुंबई

'अदानी एअरपोर्ट्स'चे मुंबई विमानतळावरील बोर्ड्स नियमानुसारच!

विराज भागवत

अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स कंपनीने वादावर स्पष्ट केली भूमिका

मुंबई: अदानी उद्योग समूहाकडे (Adani Group) जुलै महिन्यात मुंबई विमानतळाच्या (Mumbai Airport) व्यवस्थापनाचा ताबा देण्यात आला. त्यानंतर त्यांनी मुंबई विमानतळावर ठिकठिकाणी 'अदानी एअरपोर्ट्स' (Adani Airports) अशा नावाचे बोर्ड्स आणि होर्डिंग्स लावले. या संदर्भात शिवसैनिकांकडे (Shivsena) अनेक तक्रारी आल्याचे सांगत संतप्त शिवसैनिकांनी आणि भारतीय कामगार सेनेने सोमवारी सकाळी विमानतळावरील अदानी एअरपोर्ट्सचे नाव असलेले बोर्ड्स फोडून टाकले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) नाव झाकून स्वत:चे नाव दाखवण्याचा हा डाव असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. त्यावर 'अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स' (Adani Airport Holdings) यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आले. तसेच, आता लावलेला फलक हा 'एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडिया'च्या मार्गदर्शक तत्वानुसार व निकषांनुसारच (By Rules and Regulations) आहे, असेही त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.

'अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स'ने मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव किंवा त्या फलकाचे स्थान बदलले नाही. फक्त जुन्या कंपनीच्या नावाऐवजी तेथे अदानी एअरपोर्ट्स असा बदल केला आहे, असा खुलासा अदानी एअरपोर्ट्स होल्डिंगतर्फे करण्यात आला. अदानी एअरपोर्ट्सच्या फलकावरून घडलेल्या घटनांबाबत अदानी एअरपोर्ट होल्डिंग्सतर्फे हे स्पष्टीकरण जारी करण्यात आले. आता लावलेला फलक हा 'एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडिया'च्या मार्गदर्शक तत्वानुसार व निकषांनुसारच आहे. हवाई प्रवाशांच्या हितासाठी सरकारने घालून दिलेल्या सर्व मार्गदर्शक तत्वांचे पालन केले जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळावर व्यवस्थापनाचा ताबा १३ जुलैला अदानी यांच्या कंपनीला मिळाला. त्यानंतर मुंबई विमानतळाच्या विविध परिसरात अदानी एअरपोर्ट्स असे बोर्ड लावण्यात आले. VIP गेट नंबर ८ असो किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा असो या सर्व ठिकाणी अदानी एअरपोर्ट्स असे बोर्ड लावले होते. आधी JVK कंपनीने आपल्या व्यवस्थापनाचे बोर्ड्स तिथे लावले होते. पण अदानी यांच्या कंपनीला व्यवस्थापनाचा ताबा मिळाल्यानंतर त्यांनी विमानतळावर ठिकठिकाणी अदानी एअरपोर्ट्स असे बोर्ड्स लावले. या गोष्टीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील नाराजी व्यक्त केली होती. अखेर आज सकाळी शिवसैनिक आणि भारतीय कामगार सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी हे बोर्ड्स फोडून टाकले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. लातूरमधील मतदान केंद्रावर ईव्हीएममध्ये बिघाड

Sunita Williams: सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी तुर्तास स्थगित; या कारणासाठी मोहीम पुढे ढकलली

Rohit Sharma Crying : पुन्हा एकदा फ्लॉप ठरल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये रोहित शर्माला अश्रू अनावर; व्हिडिओ व्हायरल

Women Abuse Case : मोठी बातमी! परदेशातून परतताच विमानतळावर 'या' खासदाराला होणार अटक? एसआयटी झाली सतर्क

PM Modi Viral Video: "मला माहीत आहे 'डिक्टेटर' यासाठी अटक करणार नाही," ट्रोल होऊनही पंतप्रधानांचे भन्नाट उत्तर

SCROLL FOR NEXT