मुंबई

मुंबईत गेल्या 24 तासात 1237 कोरोनाबाधितांची भर; वाचा इतर सविस्तर आकडेवारी

मिलिंद तांबे


मुंबई : राज्याप्रमाणेच मुंबईतही रुग्णसंख्येचा आकडा वाढत आहे. मुंबईत आज 1,237 रुग्ण सापडले. मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 1,44,626 झाली आहे. तर, आज 30 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 7,623 वर पोहोचला आहे. आज 851 रुग्ण बरे होऊन घरी गेले. मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर 81 टक्के इतका आहे. 

मुंबईत आज झालेल्या मृत्यूंपैकी 23 जणांना दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 21 पुरुष आणि 9 महिलांचा समावेश होता. त्यातील 22 रुग्णांचे वय 60हून अधिक होते. 8 रुग्ण 40 ते 60 वयोगटादरम्यान होते. मुंबईत आतापर्यंत 1,16,351 रुग्णांना घरी सोडण्यात आले. मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी 86 दिवसांवर गेला आहे. 29 ऑगस्टपर्यंत मुंबईत एकूण 7,62,672 कोव्हिड चाचण्या करण्यात आल्या. तर, 23 ऑगस्ट ते 29 ऑगस्टदरम्यान कोव्हिड रुग्णवाढीचा दर 0.81 टक्के इतका आहे. 

559 कंटेन्मेंट झोन
मुंबईत 559 वस्त्या आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. तर, सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 6,093 असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेले 5,856 अति जोखमीच्या व्यक्ती आढळल्या आहेत.

---------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elphinstone Bridge : मुंबईतील एलफिस्टन पुलावर अखेर हातोडा

Pune ZP : राज्यामध्ये ३४ ठिकाणी अध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर; पुणे ‘झेडपी’साठी खुला प्रवर्ग, सतरा ठिकाणी महिलांसाठी आरक्षण

Karnataka accident during Ganesh Visarjan: कर्नाटकात भीषण दुर्घटना! गणेश विसर्जन मिरवणुकीत भरधाव ट्रक घुसला; आठ जणांचा मृत्यू

Rafale fighter jets India: आता शत्रूच्या उरात धडकी भरवणाऱ्या 'राफेल' लढाऊ विमानांची भारतात निर्मिती होणार!

Virar News : आंतरराष्ट्रीय किर्तीचे बॅलेनृत्य कलाकार नरेश नारायण उसनकर यांचे निधन

SCROLL FOR NEXT