मुंबई

मुंबईत कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ, मुंबईकरांसाठी हा आठवडा महत्वाचा 

समीर सुर्वे

मुंबई: कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने आता सर्वसामान्यांच्या लोकल सेवेवरही गडांतर होण्याची शक्यता आहे. महानगर पालिका पुढील आठवडाभर परिस्थितीचा आढावा घेऊन राज्य सरकारला अहवाल सादर करणार आहे. शाळा आणि महाविद्यालयांबाबतही आठवडाभराने निर्णय होऊ शकतो.

सर्वसामन्यांना पूर्वी प्रमाणे लोकल सेवा सुरु करण्यासाठी 15 दिवस निरीक्षण करण्यात येणार आहे. हा कालावधी 21-22 फेब्रुवारीला संपेल. त्या दरम्यान रुग्णसंख्येचा आढावा घेऊन सर्वसामान्य प्रवाशांबाबत निर्णय घेण्यात येईल.

काकाणी यांनी सांगितलं की, रूग्णांच्या संख्येत 10 ते 20 टक्के वाढ होत राहिल. मात्र, 22 फेब्रुवारीला होणाऱ्या आढावा बैठकीत रूग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचं निरीक्षणात आल्यास लोकलसाठी वेगळा निर्णय घेण्यात येईल. 

मुंबई महानगर पालिका आणि आजूबाजूच्या महानगर पालिकांमधील परिस्थिती विचारत घ्यावी लागेल. नंतर त्या संदर्भातील शिफारस, मुद्दे राज्यशासनाला उपलब्ध करून देऊ, त्यानंतर निर्णय घेता येईल, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. महाविद्यालय आणि शाळा सुरु करण्याबाबतही तेव्हाच निर्णय होईल असेही त्यांनी सांगितले.

-----------------------

(संपादन- पूजा विचारे)

Additional Municipal Commissioner Suresh Kakani on local train corona virus

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar Factories: राज्यात १३८ साखर कारखान्यांचे गाळप सुरू;कोल्हापूर विभागाचा साखर उतारा राज्यात सर्वाधिक

Israel Politics : इस्रायलमध्ये सत्तांतराचे संकेत, नेतन्याहू १९ वर्षांनंतर पायउतार होणार; प्रतिस्पर्ध्याला सरकार स्थापनेचे राष्ट्रपतींकडून निमंत्रण

Pune News: डेंगीच्या डासांची २,८०० घरांत पैदास; महापालिकेकडून ९० हजारांचा दंड वसूल, तर ४४८ जणांना नोटीस

Diwali 2026 Wishes in Marathi: सुख-समृद्धीच्या शुभेच्छांसह करा दिवाळीची सुरुवात; नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाचे खास संदेश

Pune Railway: हडपसर-खडकीहून ९९ फेऱ्या ;रेल्वेकडून गर्दीचे व्यवस्थापन ; दानापूरसाठी ३६ जनरल डबे

SCROLL FOR NEXT