मुंबई : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि युवासेनेचे पदाधिकारी राहुल कनाल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शनिवारी शिवसेनेत प्रवेश केला. यामुळं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची आणखी एका सहकाऱ्यानं साथ सोडली आहे. (Aditya Thackeray close aide Rahul Kanal joins Shiv Sena in presence of CM Shinde)
कनाल म्हणाले, "कोविडच्या काळात सर्वजण लोकांना जेवू घालत होते. पण आम्ही एक प्रयोग केला होता की रस्त्यावरील भटक्या प्राण्यांना खाऊ घालायचं. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी आम्हाला वांद्र्यातील भागात या कामासाठी प्रोत्साहन दिलं. त्यांची हीच सेवाभावी वृत्ती आम्ही शिकलो आहोत. कोविडच्या काळात मी केवळ सेवाच केली मेव्याशी माझा कुठलाही संबंध नव्हता.
या ठिकाणी दोनतीन दिवसांत मुंबईत बऱ्याच हालचाली घडल्या आहेत. यामध्ये अनेकांनी माझ्यावर आरोप केला की मी राजकारण करत आहे. कोणी म्हटलं की पक्षानं तुम्हाला बरंच काही दिलं. १०० टक्के दिलं पण याचं मी एक हजार टक्के परत दिलं. माझे सहकारी आणि वडिलांना एकनाथ शिंदे यांचं काम आवडत म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहेत. लोक म्हणत असतील की दिशा सालियान प्रकरणामुळं मी शिवसेनेसोबत गेलो आहे. हे आरोप माझ्यावर अनेकदा झाले आहेत. माझी इच्छा आहे की तुम्ही याचा तपास करावा, अशी माझी आपल्याला विनंती आहे.
लोकांनी आपली वागणूक बदलली त्यामुळं आम्ही आमचे रस्ते बदलले, अशा शब्दांत राहुल कनाल यांनी आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाला टोलाही लगावला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.