Aditya Thackeray
Aditya Thackeray 
मुंबई

याकूब मेमन कबर वादावर आदित्य ठाकरेंचं भाष्य; म्हणाले, निवडणुका जवळ...

सकाळ डिजिटल टीम

मुंबईतील १९९३ मधील बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमन याच्या कबरीच्या शुशोभिकरणावरुन सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. या वादावर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. महाविकास आघाडी सरकारवर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांवर त्यांनी पलटवार केला आहे. निवडणुका जवळ आल्या की असे मुद्दे भाजपकडून उपस्थित केले जातात, असा आरोप त्यांनी केला आहे. (Aditya Thackeray Comment on Yakub Memon grave Controversy)

आदित्य ठाकरे म्हणाले, राजकारण व्हावं पण किती खालच्या पातळीवर जाऊन करावं? काय आरोप करावेत? याच्यामध्ये काहीतरी भान ठेवणं गरजेचं आहे. कारण आज जे आरोप झाले आहेत ते खोटे आणि कोणालाही पटणारे नाहीत. धार्मिक वाद निर्माण करायचे नवीन काहीतरी सुरु करायचं म्हणून असे आरोप करणं कितपत योग्य आहे. या प्रकरणात दोन-तीन गोष्टी समोर येणं गरजेचं आहे. याकूब मेमनला दहशतवादी म्हणून फाशी दिली गेली. मात्र त्यानंतर त्याचं दफन एवढ्या मान-सन्मानानं झालं की त्यासाठी मोठी सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली. ओसामा बिन लादेन या दहशतवाद्याचा मृतदेह समुद्राच्या तळाशी दफन करण्यात आला. तसंच याकूब मेमनबाबत का झालं नाही? असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला.

मुंबई महापालिकेचा संबंध नाही

दुसरा मुद्दा म्हणजे याकूबचं पार्थिव त्यावेळच्या सरकारनं किंवा पोलिसांनी ज्यांच्या हातात दिलं, त्या ट्रस्टचं स्वरुप बघितलं तर ते खासगी आहे. यामध्ये महापालिकेचा संबंध येत नाही. पण तिसरी गोष्ट ही आहे की, महापालिकेकडून एनओसी घेणं गरजेचं आहे, ती एनओसी घेतली गेली नव्हती. दुसरी गोष्ट म्हणजे १८ महिन्यांनंतर मृतदेह आणि कब्रस्तान रोटेट व्हायला हवं जे काम २०१६मध्ये व्हायला पाहिजे होतं पण ते झालं नाही. तिसरी गोष्ट ज्यांनी आरोप केलेत त्यांना ही गोष्ट माहिती नाही का?

औरंगजेबाच्या कबरीबाबतही प्रश्न उपस्थित केले गेले

दरम्यान, चौथी गोष्ट म्हणजे निवडणुका जवळ आल्या की, असे मुद्दे उपस्थित केले जातात. यापूर्वी औरंगजेबाच्या कबरीबाबतही प्रश्न विचारले गेले होते. त्यानंतर ती कबर केंद्राच्या अखतारित असल्याचं सत्य समोर आल्यानंतर सर्वकाही थंड झालं. त्यामुळं सत्य परिस्थिती बघून घेणं गरजेचं आहे. बोलायला काहीही बोलू शकतात. पण ज्यावेळी मेमनचं दफन झालं तेव्हा सरकार कोणाचं होतं? त्यामुळं आरोप करणारे नक्की कोणावर चिडलेत आमच्यावर की तत्कालीन मुख्यमंत्र्यांवर? सन २०१५ मध्ये आम्ही भाजपसोबत सत्तेत होतो तेव्हा आमचं किती ऐकून घेतलं जात होतं? त्यावेळी पण आम्ही त्यांच्यासोबत बसून काँग्रेसलाच खूश करत होतो का? असे अनेक सवालही आदित्य ठाकरेंनी उपस्थित केले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT