Aditya Thackeray  Sakal
मुंबई

शिवसेनेत परतायचंय अशा बंडखोरांना आदित्य ठाकरेंचं 'हे' आवाहन

राज्यातील सत्तानाट्य आणि शिवसेनेच्या फुटीनंतर आदित्य ठाकरे अॅक्टिव्ह झाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यातील सत्तानाट्य आणि शिवसेनेच्या फुटीनंतर आदित्य ठाकरे अॅक्टिव्ह झाले आहेत. ज्या बंडखोरांना पुन्हा शिवसेनेत परतायचं आहे, त्यांच्यासाठी आदित्य ठाकरेंनी एक संदेश दिला आहे. खरी शिवसेना कोणाची? यावरून संघर्ष सुरू असताना उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटात समेट होण्याची शक्यता आहे का? या प्रश्नावर आदित्य ठाकरेंना विचारणा करण्यात आली त्यावर ते बोलत होते. (Aditya Thackeray gave this message to those rebel MLAs who want to return to Shiv Sena)

आदित्य ठाकरे म्हणाले, ज्या बंडखोर आमदारांना पुन्हा शिवसेनेत परतायचं त्यांना मी सांगितलं आहे की, जर तुम्हाला परतायचं असेल तर दरवाजे कायम खुले आहेत. दरम्यान, महाविकास आघाडीचं सरकार खाली खेचणाऱ्या मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पक्षातील बंडखोर आमदारांवर टीकास्त्र सोडलं. त्यांची ही कृती बेकायदा आणि घटनाविरोधी असल्याचंही ते म्हणाले.

शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडल्यानंतर त्यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली. पण आता मूळ शिवसेना आणि शिंदे गट यांच्यामध्ये पक्ष कोणाचा? यावरु संघर्ष सुरु झाला आहे. यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. तर शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हासाठी दोघांनी निवडणूक आयोगाकडं धाव घेतली आहे. यावर आयोगानं दोन्ही गटांना कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. पण एकूण परिस्थिती पाहता धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं जाण्याची शक्यता घटनातज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पैशासाठीच प्रमोद महाजनांची हत्या? प्रवीण महाजन भावाला करत होते ब्लॅकमेल'; प्रकाश महाजनांच्या दाव्यावर काय म्हणाल्या सारंगी महाजन?

Latest Marathi News Live Update : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण

Gold Rate Today : सोन्याचे भाव घसरले! चांदीच्या भावातही मोठी घट; जाणून घ्या आजचे भाव

Prithvi Shaw : २८ चौकार, ३ षटकार! पृथ्वी शॉ याचे विक्रमी द्विशतक; रवी शास्त्री यांचा विक्रम थोडक्यात वाचला, वीरेंद्र सेहवागच्या पंक्तित जाऊन बसला

New Rules From 1st Nov : 1 नोव्हेंबेरपासून तुमच्या खिशाला कात्री; आधार कार्डपासून बँक अकाऊंटपर्यंत 'हे' 5 नियम बदलणार, एकदा बघाच

SCROLL FOR NEXT