Balasaheb Thackeray Death Anniversary Esakal
मुंबई

Balasaheb Thackeray Death Anniversary: 'आजोबा हा नातवाचा पहिला मित्र असतो...', बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनानिमीत्त आदित्य ठाकरेंची भावनिक पोस्ट

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनानिमीत्त आदित्य ठाकरेंची भावनिक पोस्ट

अंकिता खाणे (Ankita Khane)

शिवसेनाप्रमुख आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज आज स्मृतिदिन आहे. बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देत आज अनेक राजकीय मंडळींनी 'एक्स'(ट्वीटर)च्या माध्यमातून श्रद्धांजली दिली आहे. शिवाजी पार्क परिसरामध्ये त्यांच्या स्मृतिस्थळावर देखील अनेकांनी नतमस्तक होण्यास गर्दी केली आहे. बाळासाहेबांचे नातू आणि आदित्य ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी खास पोस्ट लिहित आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

काय आहे आदित्य ठाकरेंची पोस्ट?

आजोबा आणि नातू हे नातं जगात सगळ्यात ‘स्पेशल’ असतं…

त्यात आदर असतोच,

पण मैत्री जास्त असते…

धाक असतोच,

पण प्रेम जास्त असतं…

वयाचं अंतर असतंच,

पण मन जवळ असतं….

आजोबा हा नातवाचा पहिला मित्र असतो… त्यापेक्षा घट्ट मित्र दुसरा कोणीही असू शकत नाही!

मी भाग्यवान आहे की, जगासाठी 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे' असलेला युगपुरूष माझा 'आज्या' आहे ...

बाळासाहेबांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन!

अशी पोस्ट त्यांनी लिहली आहे.

बाळासाहेबांना अभिवादन केल्यानंतर शिवाजी पार्कवर शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा

स्व. बाळासाहेब ठाकरे यांची शुक्रवारी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त एक दिवस अगोदरच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवाजी पार्कवर पोहोचले. त्यांनी बाळासाहेबांना अभिवादन केल्यानंतर शिवाजी पार्कवर शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवाजी पार्कवरुन गेल्यानंतर त्या ठिकाणी ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर गोळा झाले आणि त्यांनी स्मारकाच्या ठिकाणी शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध नोंदवला. तेव्हा दोन्ही गट एकमेकांना भिडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ईडीने जप्त केलेली 3,464 कोटींची मालमत्ता विक्री करण्यास कोर्टाची मंजुरी; गुंतवणूकदारांचे 1,950 कोटी माघारी मिळणार

Akola Crime : कार लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश! ‘एलसीबी’कडून सहा तासांत तीन आरोपी अटकेत, १८.७० लाखांचा मुद्देमाल जप्त

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखान्याच्या विजयी उमेदवारांनी अजितदादांना वाहिली आदरांजली

Cordelia Sky : १,५०० ड्रोनच्या रोषणाईने मुंबईचे आकाश उजळले! ‘कॉर्डेलिया स्काय’चे आगमन

INS Mangrol : मुंबईच्या सागरी सुरक्षेला स्वदेशी ‘आयएनएस मंगरोल’चे बळ!

SCROLL FOR NEXT