CM Ekanth Shinde , Thackeray family uddhav thackeray Aditya thackeray mumbai sakal
मुंबई

Aditya Thackeray: एकनाथ शिंदेंच्या बंडाबाबत आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट; म्हणाले, माहिती होतं...

आदित्य ठाकरे दावोसमध्ये असताना काही घडामोडी घडत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : शिवसेनेतून बंड केल्यानंतर भाजपसोबत सरकार स्थापन करुन मुख्यमंत्री बनलेल्या एकनाथ शिंदे यांच्या बंडाबाबत ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळं आता नव्या चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता आहे. (Aditya Thackeray speaks secret regarding Eknath Shinde rebellion)

शिंदेंच्या बंडाची कुणकुण आम्हाला लागली होती. याबाबत त्यांच्याकडं आम्ही विचारणाही केली होती, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर हे बंड नसून गद्दारी असल्याचं सांगताना त्यांनी आमच्या पाठित सुरा खुपसला अशी संतप्त प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. लोकमतच्या एका कार्यक्रमात त्यांनी हा खुलासा केला आहे.

शिंदेंच्या बंडाची जी कुणकूण लागली होती त्याचा सविस्तर तपशील सांगताना आदित्य ठाकरे म्हणाले, "मी दावोसला गेलो होतो त्याचवेळी तत्कालीन मुख्यमंत्री माझे वडील उद्धव ठाकरे यांच्यावर मानेच्या दुखण्यामुळं दोन शस्त्रक्रिया झालेल्या होत्या. त्याचवेळी एकनाथ शिंदेंच्या मनात वेगळचं काहीतरी सुरु होतं. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर मुख्यमंत्री होता येईल का? याची बहुतेक ते चाचपणी करत होते, याची कुणकुण आम्हाला लागली होती. त्यामुळं तुम्ही बंडखोरीचा विचार करत आहात का? अशी विचारणाही उद्धव ठाकरेंनी त्यांच्याकडं २० मे रोजी केली होती.

दरम्यान, शिंदेंच्या बंडाला बंड न म्हणता ही गद्दारी असल्याची संतप्त भाष्य आदित्य ठाकरेंनी केलं आहे. त्यांनी आमच्या पाठीत सुरा खुपसला. स्वतःला विकलेल्या लोकांना थांबवून करणार काय? स्वतःचा आत्मा विकलेल्या लोकांकडून दुसरी कुठली अपेक्षा करणार असंही यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Tourism Latest Update : गणपतीपुळे बीच अखेर पर्यटकांसाठी खुला! 2 महिन्यांनंतर बंदी उठवली; पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण

थकलेला चेहरा, चालताही येईना... नवऱ्याला अखेरचा निरोप देताना अरुणा इराणी यांना अश्रू अनावर; या कलाकारांचीही हजेरी

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Latest Marathi News Live Update : नवी मुंबई खारघर रेल्वे स्थानकावर ओव्हरहेड वायरमध्ये शॉर्टसर्किट; रेल्वे वाहतूक ठप्प

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

SCROLL FOR NEXT