Aditya Thackeray vs Jitendra Awhad
Aditya Thackeray vs Jitendra Awhad esakal
मुंबई

आव्हाडांना विरोध करू नका, आदित्य ठाकरेंनी दिला होता दम; शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखाचा गौप्यस्फोट

सकाळ डिजिटल टीम

राज्याच्या राजकारणात उलथापालथ होऊन शिवसेनेत मोठी फूट पडली आहे.

ठाणे : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 40 आमदारांनी बंडं केलं, त्यामुळं राज्यातील महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) कोसळलं. सत्तांतरानंतर राज्याच्या राजकारणात उलथापालथ होऊन शिवसेनेत (Shiv Sena) मोठी फूट पडली. आता ठाकरे गट आणि शिंदे गट आमनेसामने आहेत. एकमेकांविरुध्द आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.

त्यातच आता शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. कळवा परिसरात शिवसेना वाढावी म्हणून मी प्रयत्न करत होतो. मात्र, त्याचवेळी आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) मला फोन करून जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना विरोध करू नका असा दम दिला होता, असा गौप्यस्फोट म्हस्के यांनी केला. हिंदुगर्वगर्जना या कार्यक्रमात ते बोलत होते.

दसरा मेळाव्याला बालेकिल्ल्यातून 30 हजार शिवसैनिक जाणार

कळवा परिसरात आगामी महापालिकेत शिवसेनेचे अधिकाधिक नगरसेवक निवडून यावे याकरिता मी आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे प्रयत्न करत होतो. त्याकरिता आम्ही मेळावे घेतले. मात्र, त्याचवेळी आमचे छोटे सरकार अर्थात आदित्य ठाकरेंनी मला फोन करून आव्हाड यांना विरोध करू नका, असा दम दिला होता, असं म्हस्केंनी भाषणात स्पष्ट केलं. दरम्यान, बीकेसी येथील दसरा मेळाव्याला ठाणे या एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातून ३० हजार शिवसैनिक घेऊन जाण्याचं आमचं लक्ष आहे, असंही त्यांनी सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT