sudhir mungantiwar  Sakal
मुंबई

"आदित्य ठाकरे गुरुदक्षिणा नक्की देतील"; मुनगंटीवार सभागृहात असं का म्हणाले?

विधानसभेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी विविध नेत्यांनी भाषणं केली.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : विधीमंडळात विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यानंतर त्यांचं अभिनंदन करण्यासाठी विधानसभेत विविध नेत्यांची भाषण पार पडली. यावेळी भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आदित्य ठाकरेंना उद्देशून एक विधान केलं. आदित्य ठाकरे गुरुदक्षिणा नक्की देतील, असं विधान त्यांनी केलं. पण ते असं का म्हणालेत याची चर्चा सुरु झाली आहे. (Aditya Thackeray will definitely give Gurudakshina Mungantiwar says in Maharashtra legislature)

मुनगंटीवार बोलायला उभे राहिल्यानंतर नवनिर्वाचित अध्यक्षांना उद्देशून म्हणाले, "आदित्य ठाकरे इथे आहेत. ते माझ्याकडून बघून म्हणाले की, तुम्ही त्यांना शिकवलं आहे आणि आपले संस्कार हेच आहेत. आपण शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या गुरुस्थानी आहात. या सभागृहात माझा विश्वास आहे तुम्ही त्यांना शिकवलं असल्यानं या सभागृहाचं कामकाज उत्तम पद्धतीनं होण्यासाठी शिष्य म्हणून ही गुरुदक्षिणा आदित्य ठाकरे निश्चित देतील. अजून काही सदस्य वाचले तर तेही गुरुदक्षिणा देऊ शकतील"

मुनगंटीवार यांनी केलेल्या या विधानाचा राजकीय अर्थ काढला जात आहे. आमदारांची फोडाफोडी होणार नाही याची काळजी आदित्य ठाकरे घेतील, अशी अपेक्षा मुनगंटीवारांना असल्याचं बोललं जात आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आदित्य ठाकरेंचे गुरु असल्याचं सांगताना आता नार्वेकर विधानसभा अध्यक्ष असल्यानं त्यांचा आदित्य ठाकरे मान ठेवतील असंही मुनगंटीवर यांनी म्हटलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणेशोत्सवासाठी धावणार चिपळूण-पनवेल मेमू, मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस गाडीचीही घोषणा; पाहा वेळापत्रक

Sindhudurg Teacher Recruitment: सिंधुदुर्गात शिक्षक भरतीचा फज्जा? २८२ पदांची जाहिरात, मिळणार फक्त १६९ शिक्षक; पुन्हा २२५ पदे रिक्त

Mumbai Crime: मुंबईत हायप्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, २६ वर्षीय मॉडेलचा सौदा; प्रसिद्ध हॉटेलच्या रूमवर कंडोमचा बॉक्स अन्...

Marathi News Live Updates : सोलापुरात मराठा आंदोलकांचा रास्ता रोको, पुणे-हैदराबाद महामार्गावर वाहतूक ठप्प

७०,००,००,०००! सचिन तेंडुलकरने 'मुंबई-पुणे'जवळ खरेदी केला भूखंड, ३.९ एकरावर उभारणार सेकंड होम; नेमकी ही जागा कुठे?

SCROLL FOR NEXT