mumbai  sakal
मुंबई

‘आयटीआय’ मध्ये प्रवेशासाठी विशेष मोहीम

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत येणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थां (आयटीआय) मधील प्रवेश प्रक्रिया सुरू

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत येणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थां (आयटीआय) (ITI) मधील प्रवेशासाठी (Admission) प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. यात मुंबईत (Mumbai) असलेल्या शासकीय आयटीआयमध्ये ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांनी सर्वाधिक प्रवेश घ्यावेत, असे आवाहन केले जात आहे. मुंबई (Mumbai), ठाणे (Thane) परिसरात असलेल्या सरकारी, खासगी आस्थापनेत मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण आणि त्यातून शुल्क प्रतिपूर्तीचा लाभ मिळणार असल्याने या प्रवेशासाठी एक विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे.

मुंबई आणि परिसरात १३ शासकीय आणि १४ हून अधिक खासगी संस्थांकडून चालविण्यात येणाऱ्या आयटीआय कार्यरत आहेत. यामध्ये सुमारे ४ हजारांहून अधिक जागा उपलब्ध आहेत. आयटीआय प्रवेशासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थी आपल्या जिल्ह्यात असलेल्या संस्थांना प्राधान्य देत असल्याने शहरी भागातील जागांवर प्रवेश कमी होतात. त्यामुळे मुंबईत असलेल्या शासकीय आयटीआयमधील प्रवेशातून होणारे फायदे विद्यार्थ्यांच्या लक्षात यावेत, यासाठी विभागाकडून येथे उपलब्ध असलेल्या जागांची माहिती, त्यासाठी प्रवर्गनिहाय जागा, प्रवेश शुल्क उपलब्ध सोयी-सुविधा आदींची माहिती प्रसिद्ध केली जात आहे.

मुंबई, ठाणे या परिसरात विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यानंतर मिळणाऱ्या रोजगाराच्या तसेच प्रशिक्षणाच्या संधीचीही माहिती दिली जात आहे. विशेषत: मुंबई आणि परिसरात बेस्ट, एसटी, रेल्वे, यासोबत केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध संस्थांमध्ये रोजगार आणि प्रशिक्षणाच्या संधी आयटीआय करणाऱ्या विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहेत.

५४९ खासगी आयटीआय

राज्यात एकूण ५४९ खासगी आयटीआय आहेत. ज्यात प्रत्येक तालुक्यात किमान १ शासकीय आयटीआय सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार ३५८ तालुक्यांत ४१७ शासकीय आयटीआय आहेत. त्यामध्ये आदिवासी भागात आदिवासींसाठी ६१ संस्था, अनुसूचित जाती व नवबौद्धांच्या मुला-मुलींसाठी ४ उच्चस्तर संस्था, अल्पसंख्याकांसाठी स्वतंत्र २ संस्था व ४३ शासकीय आयटीआयमध्ये स्वतंत्र तुकड्या, महिलांसाठी १५; तर २८ आदिवासी आश्रमशाळा आयटीआय अशा संस्थांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Milk Price Hike: दसरा-दिवाळीआधीच दूध महागणार? तब्बल 8 रुपयांची वाढ! सरकारला 3 दिवसांचा अल्टिमेटम

Asian Games 2026: मुंबईच्या पोरीची जपानमध्ये हवा! Quimcy Dsouza ऐतिहासिक पदक जिंकण्याच्या उंबरठ्यावर; ती खेळते, तो Teqball नक्की आहे तरी काय?

IIT Bombay ChatGPT Incident : IIT बॉम्बे विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर अधिकृत खुलासा; शिस्तभंगाची कारवाई केली होती का? संस्थेने सांगितलं सत्य

Nagpur Longest Flyover : गडकरींचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण! इंदोरा ते दिघोरी 8.9 किमीचा प्रवास आता सुसाट; उड्डाणपुलाला मिळणार डॉ. हेडगेवार यांचे नाव, जाणून घ्या नवीन पुलाविषयी...

Latest Marathi News Update : विदर्भातील दुष्काळाची परिस्थिती गंभीर; नेते काजू बदाम नाष्टा करताना फोटो व्हायरल, शेतकरी नेत्यांचा संताप

SCROLL FOR NEXT