मुंबई

मुंबईत खाद्यतेलाची भेसळ करणार्‍यांवर 15 दिवसांत तिसरी कारवाई

भाग्यश्री भुवड

मुंबई: कमी दर्जाचे खाद्यतेल विक्रीप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाकडून बुधवारी दहिसरमधील ओम ट्रेडिंग कंपनीवर छापा घालण्यात आला. गेल्या 15 दिवसांमधील कमी दर्जाच्या तेलाची साठवणूक आणि विक्री करणार्‍या कंपन्यांवर कारवाई करण्याची एफडीएची ही तिसरी वेळ आहे.

कमी दर्जाचे खाद्यतेल आणि त्याचा पुनर्वापर करत असल्याच्या अनेक तक्रारी एफडीएकडे येत आहेत. त्यापार्श्वभूमीवर एफडीएकडून धडक कारवाई करण्यात येत आहे. घाटकोपर आणि नळ बाजारामध्ये कारवाई केल्यानंतर एफडीएच्या अन्न सुरक्षा अधिकार्‍यांनी 9 डिसेंबरला दहिसर येथील ओम ट्रेडिंग कंपनीवर छापा टाकला. 

कमी दर्जाचे खाद्यतेल विक्रीसाठी ठेवल्याच्या संशयावरून एफडीएने ही कारवाई केली असता त्यांना खाद्यतेल भरण्यासाठी डब्यांचा पुनर्वापर करत असल्याचे आढळून आले. यामध्ये रिफाईन्ड सनफ्लॉवर ऑईल, इम्पोर्टेड आरबीडी पामोलिन ऑईल, शेंगदाणा तेल, मस्टर्ड एक्सपेलर तेल असा जवळपास 3428.9 किलोचा साठा जप्त केला असून, त्याची किंमत 3 लाख 66 हजार 912 रुपये इतकी आहे. जप्त केलेल्या साठ्याचे नमूने विश्लेषणासाठी पाठवण्यात आले असून अहवाल मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे एफडीएचे सह आयुक्त शशिकांत केंकरे यांनी सांगितले. सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री राजेंद्र पाटील येड्रावकर राजेंद्र पाटील, आयुक्त अभिमन्यू काळे, सहाय्यक आयुक्त अजित मैत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी एस.एस. क्षीरसागर यांनी ही कारवाई केली.

कमी दर्जाचे किंवा खाद्यतेलामध्ये भेसळ करण्यात येत असल्याच्या घटना तुमच्या परिसरात आढळून आल्यास त्यासंदर्भातील माहिती प्रशासनाचे टोल फ्री क्रमांक 1800222365 वर देण्यात यावी असे आवाहन एफडीएकडून करण्यात आले आहे.

--------------------

(संपादन- पूजा विचारे)

Adulterated oil sezied Dahisar by Food and Drug Administration

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT