मुंबई

कोरोना नसतानाही रिपोर्ट दिला पॉझिटिव्ह, वकील मॅडमने खासगी लॅबवर ठोकला 'इतक्या' लाखांचा दावा...

सकाळवृत्तसेवा

मुंबई : कोरोनाबाधित नसतानाही कोरोनाचा पॉझिटिव्ह अहवाल देऊन मानसिक त्रास देणार्या लॅबच्या विरोधात महिला वकिलाने 99 लाख रुपयांचा दावा दाखल करण्याची नोटीस बजावली आहे.

विशेष म्हणजे या चुकीच्या अहवालावरुन मुंबई महापालिकेने महिला वकिलाचे घरही सील केले होते. वांद्रे येथे राहणाऱ्या वकील वंदना शहा यांनी एका खासगी प्रयोगशाळेला नोटीस बजावली आहे. रुग्ण विश्वासाने वैद्यकीय चाचणीसाठी तुमच्याकडे येतात आणि तुम्ही चुकीचे अहवाल त्यांना देता, यावरून वैद्यकीय निष्काळजीपणा उघड दिसत आहे, असे नोटीसीमध्ये म्हटले आहे.

कोरोनाची चाचणी केल्यानंतर त्यांना फोनवरून, पॉझिटीव्ह असल्याची माहिती देण्यात आली. नंतर त्यांचे घरही सील करण्यात आले आणि कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले. त्यांचा लेखी रिपोर्ट त्यांच्या डॉक्टरला ईमेल करण्यात आला. मात्र त्यातही तारखांचा घोळ होता. त्यांनी ज्या तारखेला (13 मे) चाचणी केली होती त्याचा उल्लेख अहवालात नव्हता तर त्या नंतरच्या दिवसाची नोंद केली होती.

त्यामुळे त्यांनी सहा दिवसांनी दुसऱ्या लैबमधून चाचणी केली. तेव्हा तो अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे त्यांनी आता खासगी लॅबला नोटीस बजावली आहे. बिनशर्त माफी त्याचसोबत नुकसान भरपाई देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. 

advocate from mumbai sued private lab for giving false report

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IndiGo Flight: विमान उड्डाणाच्या काही क्षण आधी मोठा ट्विस्ट! पायलटचा उड्डाणास नकार; प्रवाशांचे आंदोलन

Junior Asia Cup Hockey: तब्बल १९ गोल... भारताच्या पोरींनी उडवली पाकिस्तानची पुरती धुळधाण! सेमीफायनलमध्ये दिमाखात धडक

LIC Investment: फक्त 24 रुपये भरून मिळेल 50 लाखांचा इन्शुरन्स! LIC ची बेस्ट स्कीम पाहिली का?

Viral Video : आधी पैसे द्या, मगच जेवण करा! या देशातील लग्नाची अनोखी प्रथा पाहून भारतीय महिलेलाही बसला धक्का, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

Marathi News Live Updates : माहिती अधिकाराचा बोजवारा, तीस दिवसांत मिळणे अपेक्षित असलेल्या माहितीसाठी साडेतीन वर्षांचा विलंब; स्वाक्षरीसाठीही तब्बल ११ महिने

SCROLL FOR NEXT