मुंबई

वीज कर्मचाऱ्यांचा आजचा संप मागे, उर्जामंत्र्यांच्या बैठकीनंतर मध्यरात्री संप पुढे ढकलला

तेजस वाघमारे

मुंबई, ता. 14 : वीज कंपन्यातील कर्मचाऱ्यांना दरवर्षीप्रमाणे परंपरेनुसार बोनस देण्याची घोषणा केल्यानंतर रात्री 12 वाजता ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी कामगार संघटनांच्या नेत्यांसोबत ऑनलाईन बैठक घेतली. या बैठकीत ऊर्जा मंत्र्यांनी वीज कामगार संघटनांना केलेल्या आवाहनानंतर एक दिवसीय संप पुढे ढकलण्याचा निर्णय संघटनांनी मध्यरात्री घेतला.

वीज कंपन्यांनी कामगारांना बोनस देता येणार नसल्याची भूमिका घेतल्याने सर्व संघटनांनी एकत्रित येत एक दिवस संपावर जाण्याचा इशारा दिला होता. यानुसार 14 नोव्हेंबरला सकाळी 8 वाजेपासून हा संप सुरू होउन रविवार 15 नोव्हेंबरला सकाळी 8 वाजेपर्यंत संप चालेल, असे कामगार संघटनांनी जाहीर केले होते.

मात्र कामगार संपावर जाण्याच्या काही तास अगोदरच ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी वीज कामगारांना तत्वतः बोनस देण्याची घोषणा केली आहे. त्याचप्रमाणे दिवाळीच्या कालावधीत वीज ग्राहकांना त्रास होईल, असे काम करू नये असे आवाहनही राऊत यांनी केले होते. त्यानंतर कामगार,अभिंयते व अधिकारी संघटना पदाधिकारी यांची रात्री 12 वाजता आॕनलाईन गुगल मिटवर बैठक आयोजित केली. या बैठकीत राऊत यांनी संघटनांना संप मागे घेण्याची विनंती केली.

या बैठकीतील चर्चेनंतर वीज कामगार संघटनांनी तृर्त संप पूढे ढकल्याचा निर्णय घेण्यात आल्याचे, महाराष्ट्र स्टेट इलेक्‍ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे सरचिटणीस कॉ.कृष्णा भोयर यांनी सांगितले.

( संपादन - सुमित बागुल )

after meeting with energy minister nitin raut electricity company workers rolls back the strike

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट; पुढील दोन दिवसांत निर्णयाची शक्यता, ऑगस्टचा १५०० रुपयांचा हप्ता कधी मिळणार?

Weekly Horoscope: १४ ते २० सप्टेंबरचा आठवडा ठरणार खास! या राशींना मिळणार पैसा, करिअरमध्ये संधी आणि प्रेमात सुख

Koyna Dam : सांगली पाटबंधारे विभागाच्या मागणीनुसार कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग

Marathi News Live Updates : वरंधा घाटात मध्यरात्री दोन कारची समोरासमोर धडक, तिघे गंभीर जखमी

Ratnagiri CNG: ऐन गणेशोत्सवात सीएनजीचा ठणठणाट; रत्नागिरी, चिपळूण, संगमेश्वरात रांगा; चाकरमानीसह रिक्षाचालक त्रस्त

SCROLL FOR NEXT