sachin-waze.jpg 
मुंबई

सचिन वाझेच्या अटकेनंतर भाऊ सुधर्म वाझेची पहिली प्रतिक्रिया

दीनानाथ परब

अँटिलिया बाहेर स्कॉर्पियो कारमध्ये सापडलेल्या स्फोटक प्रकरणात काल तब्बल १२ तासांच्या चौकशीनंतर पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक झाली. अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेली कार, त्यानंतर ही कार ज्यांच्याकडे होती, त्या मनसुख हिरेन यांचा झालेला मृत्यू. एकूणच हे सर्व प्रकरण संशयास्पद आहे. मनसुख हिरेन आणि सचिन वाझे परस्परांना ओळखत होते. त्यामुळेच सचिन वाझे हे प्रमुख संशयित आहेत. एकूणच या प्रकरणात वाझे कुटुंबीयांची काय भावना आहे ? ते सुधर्म वाझे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले. 

सुधर्म वाझे हे सचिन वाझे यांचे बंधु आहेत. दोन दिवसांपूर्वीच ते मुंबईत येऊन सचिन वाझेंना भेटून गेले. "सचिन वाझे यांनी त्यांच्या व्हॉट्स अॅपवर जे स्टेटस ठेवलं होतं, त्याच प्रकारची त्यांची भावना आहे" असे सुधर्म वाझे म्हणाले. "सचिन वाझे सक्षम अधिकारी आहेत, ते तपासात सहकार्य करतील यात शंका नाही" असे सुधर्म वाझे म्हणाले. सचिन वाझेंचा स्वभाव कसा आहे? या प्रश्नावर सुधर्म वाझे यांनी, एक पोलीस अधिकारी कसा असला पाहिजे?, बुद्धी चातुर्य हे सर्व गुण त्यांच्यामध्ये असल्याचे सांगितले. 

"सध्याची कुटुंबीयांची स्थिती कोणाच्याही लक्षात येणार नाही. एखाद्यावर जेव्हा असा प्रसंग येतो, त्यालाच ते समजते" असे सुधर्म वाझे म्हणाले. दोन महिन्यात मी यातून बाहेर येईन, असं सचिन वाझेंनी म्हटलं होतं. त्यावर सुधर्म वाझे म्हणाले कि, "त्यांना या प्रकरणात  अडकवलं गेलं तर ते अनिश्चित आहे. सचिन वाझेंच्या अटकेची बातमी अधिकृतपणे कोणी सांगितली नाही. प्रसारमाध्यमांमधूनच आम्हाला समजलं."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या भावात घसरण! सणासुदीत 10 ग्रॅमचा भाव किती? पाहा ताजा दर

America Car Culture : अमेरिकेत मर्सिडीज-बीएमडब्ल्यू पाहून श्रीमंत समजू नका! भारतीय तरुणाने सांगितलं धक्कादायक वास्तव, पाहा VIRAL VIDEO

Dusseldorf Ganeshotsav : ड्युसेलडॉर्फमध्ये गणरायाची भव्य मिरवणूक; ढोल-ताशांच्या गजरात रंगला मराठमोळा उत्सव

Marathi News Live Updates : आशियाई क्रीडा स्पर्धेत हिमांशू ढिल्लनला रौप्य, तर रुद्रांक्ष पाटीलला कांस्य पदक

IND vs WI, ODI: रोहित शर्मा वेस्ट इंडिजविरुद्ध घालणार धुमाकूळ? सचिन, डिविलियर्सचे विक्रम मोडण्याची संधी

SCROLL FOR NEXT