मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना अयोध्येतून येण्यापासून रोखणारे भाजपचे खासदार बृजभूषण सरण सिंह यांच्याविरोधात आता मुंबईतल्या उत्तर भारतीयांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. बृजभूषण सिंह १४ वर्षे झोपले होते काय? असा सवाल उत्तर भारतीय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. (Aggitation of North Indians in Mumbai against Brijbhushan Singh)
मुंबईतील उत्तर भारतीय संघटनेचे नेते गोविंद पांडे म्हणाले, बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंना उत्तर भारतातून विरोध करण्याऐवजी मुंबईत येऊन विरोध करायचा होता. २००८ पासून तुम्ही कुठे होतात? घरात बसून धमक्या कोणीही देऊ शकतं. राज ठाकरेंना उत्तर प्रदेशात येण्यापासून रोखण्यात शरद पवार यांचाच हात होता, असा आरोपही त्यांनी केला.
बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंविरोधात भूमिका घेतल्यानंतर जर त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले तर इथल्या उत्तर भारतीयांच्या मदतीसाठी ते येणार आहेत का? असा सवाल पांडे यांनी केला आहे. राज ठाकरे युपीत जातील तेव्हा आम्ही त्यांच्यासोबत असू. तर बृजभूषण सिंह जेव्हा मुंबईत येतील तेव्हा त्यांना आम्ही सर्वात आधी चपलांचा हार घालू असा इशाराही मुंबईतील उत्तर भारतीयांनी दिला आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांनी ५ जून रोजी अयोध्येचा दौरा घोषीत केला होता. पण या ठिकाणी येण्यापासून बृजभूषण सिंह यांनी त्यांना रोखलं होतं. आधी उत्तर भारतीय नागरिकांची माफी मागा मगच अयोध्येत येऊ देऊ, असा पवित्रा बृजभूषण सिंह यांनी घेतला होता. त्यामुळं राज ठाकरेंना आपला दौरा रद्द करावा लागला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.