मुंबई

"मुर्दाबाद मुर्दाबाद, चायनावाले मुर्दाबाद" RPI चं मुंबईत चीनविरोधी आंदोलन...

सकाळवृत्तसेवा

मुंबई चेंबूर : एकीकडे जगभरात कोरोना पसरवण्यास चीन कारणीभूत आहे. तर दुसरीकडे कोरोनाच्या संवेदनशील काळातही चीन आपल्या सर्वच शेजारील राष्ट्रांशी आगळीक करतोय. आधीच कोरोनामुळे जगभरात चीन विरोधात वातावरण तयार झालच आहे. अशातच आता आता भारताच्या लडाखमधील गलवान खोऱ्यात चीनने घुसखोरी केलीये. भारतीय हद्दीत चीन ने केलेली घुसखोरी, केवळ घुसखोरिच नव्हे तर भारतीय जवानांसोबत झालेली झटाटपट भारतीयांच्या मनात चीन विरोधात प्रचंड चीड निर्माण करणारी अशीच आहे.   

चीनची घुसखोरी रोखण्यासाठी गेलेल्या भारतीय सैनिकांवर चीनी सैनिकांनी हल्ला केला. हॉकीस्टिक आणि दगडांनी केलेल्या हल्ल्यात 20 भारतीय जवान शहिद झाले. या घटनेनंतर संपुर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील चेंबूरमध्ये रिपब्लिकन पार्टी पफ इंडिया RPI च्या आठवले गटाच्या वतीने चीनचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी शहिद जवानांना श्रध्दांजली देखील अर्पण करण्यात आली.

रिपाई आठवले गटाचे रवी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली चेंबूर रेल्वे स्टेशनपुढच्या चायना विला या हॉटेलसमोर हे आंदोलन करण्यात आले. यापुढे चिनी सामान विकत न घेण्याचे आवाहन त्यांनी केले. त्याचसोबत चीनच्या अनेक वस्तू भारतात वापरल्या जातात. अशात आपण जोपर्यंत चीनचा आर्थिक कणा तोंडात नाही तोपर्यंत चीन ठिकाण्यावर येणार नाही असं या आंदोलकांचं म्हणणं आहे. कोरोनाच्या फिसजीकल डिस्टंसिंगचे नियम पाळून हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी, "मुर्दाबाद मुर्दाबाद चायनावाले मुर्दाबाद" अशा घोषणा देण्यात आल्यात. 

Agitation by RIP athawale group in chembur against china

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan: ''पोरांनो, चला घरी! सोनम, खूप झालं भावा.. आता विषय वाढवू नको!'', सलमानने वांगचुक यांना दिली खास ऑफर

Sachin Tendulkar on Student Protest: "माझे वडील प्राध्यापक होते..."; सचिन तेंडुलकरची विद्यार्थ्यांसाठी भावनिक पोस्ट; म्हणाला, जेव्हा विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळत नाही...

Krishna River Project: कृष्णा नदीचे पाणी दुष्काळी भागाकडे वळविणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला शासनाची प्रशासकीय मान्यता; रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशीचा विश्वविक्रम, पण नाही मिळाला 'मॅन ऑफ दी मॅच' पुरस्कार; श्रेयस अय्यर काय म्हणाला वाचा...

Birth Certificate Name Change Ban : जन्म-मृत्यू दाखल्यातील पूर्ण नावबदलाला मज्जाव; फक्त मात्रा, स्पेलिंग दुरुस्तीला परवानगी

SCROLL FOR NEXT