Ajay Sengar Karni Sena 
मुंबई

Ajay Sengar: अजय सेंगर पुन्हा बरळले! संविधानविरोधी वक्तव्य केल्यानं आंबेडकरवादी कार्यकर्त्यांकडून चोप

पनवेल इथं सेंगर यांना मारहाण करण्यात आली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

पनवेल : नेहमी वादग्रस्त विधानं करणारे करणी सेनेचे महाराष्ट्र प्रमुख अजय सेंगर यांना पुन्हा तेच केल्यानं काही आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. भारतीय राज्यघटनेबाबत आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप मारहाण करणाऱ्यांनी केला आहे. या मारहाणीचा व्हिडिओदेखील समोर आला आहे. (Ajay Sengar beaten up by Ambedkarwadi at Panvel due to anti constitution statement)

नेमकं काय घडलं?

करणी सेनेचे महाराष्ट्रातील प्रमुख असलेले अजय सेंगर हे अनेकदा आक्षेपार्ह आणि वादग्रस्त विधानांमुळं चर्चेत आले आहेत. आत्ताही त्यांनी भारतीय राज्यघटनेबाबत आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप त्यांना मारहाण करणाऱ्या आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी केला आहे. (Marathi Tajya Batmya)

यापूर्वीही सेंगर यांनी अनेकदा भडकाऊ आणि आक्षेपार्ह विधानं केली आहेत. यापूर्वी भीमा कोरेगाव विजय दिनावरही आक्षेप घेत राज्य सरकारनं यावर प्रतिबंध घालत हे स्मारक उद्धवस्त करण्याची मागणी केली होती. सेंगर यांच्या या भडकाऊ मागणीमुळं पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात धर्माच्या आधारे जात समुहांना भडकवण्याच्या आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Latest Marathi News)

दरम्यान, यापूर्वी त्यांनी 'संविधान हटवा आणि मनुस्मृतीनुसार देश चालवा' अशी मागणी देखील केली होती. त्यामुळं सेंगर आणि आंबेडकरवादी यांच्यात कायम संघर्ष पहायला मिळतो. आज मात्र, सेंगर यांच्या अशाच पद्धतीच्या संविधानविरोधी वक्तव्यामुळं काही आंबेडकरवाद्यांनी त्यांच्यावर थेट हल्ला चढवला. या मारहाण प्रकरणी पोलीस कारवाईबाबत अद्याप कुठलीही माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

Success Story: शेतकरी कुटुंबातील मुलाची 'एनडीएत' भरारी; अमेय साळुंखेंचा देशात 34 वा क्रमांक, लहानपणीच पितृछत्र हरपलं, आईने कष्टाने वाढवलं..

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

SCROLL FOR NEXT