मुंबई

पुन्हा झटका, उपमुख्यमंत्र्यांनी दिलेली 'ती' स्थगिती ऊर्जामंत्र्यांनी उठवली

पूजा विचारे

मुंबई: अर्थसंकल्पीय अधिवेशनात झालेल्या चर्चेत वीज जोडणी तोडण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थगितीचं आश्वासन दिलं होतं. मात्र ही स्थगिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी उठवल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे राज्य सरकारनं पुन्हा एकदा सर्वसामान्यांना झटका दिला आहे.

वीज तोडणीसंदर्भात ऊर्जामंत्र्यांनी निवेदन काढले आहे. त्यामुळे थकबाकीदारांवर वीज तोडणीसंदर्भात टांगती तलवार असणार आहे. त्यामुळे आतापर्यंत वीज बिल न भरणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना मोठा झटका बसला आहे.

राज्यात २२ मार्च २०२० पासून कोविड १९ या महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे मार्च २०२० ते जून २०२० या कालावधीत कोविडचे निर्बंध अत्यंत कडक राबविण्यात आल्याने या कालावधीतील वीज देयके  महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या निर्देशानुसार मागील 3 महिन्याच्या सरासरीवर आधारित वीज देयके देण्यात आली होती.

राज्यातील सुमारे 2.50 कोटी घरगुती ग्राहकांपैकी 6 लाख 94 हजार इतक्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी 99 टक्के तक्रारींचे समाधानकारक निरसन करण्यात आले.  याव्यतिरिक्त ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरणव्दारे विविध सवलती आणि उपायोजना करण्यात आल्या. दरम्यान, 2 मार्च, 2021  विधान सभेत झालेल्या चर्चेत महावितरणाव्दारे वीज ग्राहकांची जोडणीबाबत अधिवेशन कालावधीत चर्चा होण्याच्या आधीन राहून थकबाकीदार ग्राहकांची वीज जोडणी तोडण्यास उपमुख्यमंत्र्यांनी स्थगितीचे आश्वासन दिली होती.

ऊर्जामंत्र्यांनी निवेदनात म्हटलं की, थकबाकीदार ग्राहकांची वीज जोडणी तोडण्यासंदर्भात देण्यात आलेली स्थगिती सभागृहाच्या परवानगीने उठविण्यात आली आहे.  सद्यपरिस्थितीत केंद्र शासनाकडून शासकीय वीज वितरण कंपन्यांचे खासगीकरण आणि परवानामुक्त करण्याचे धोरण असल्याचे दिसून येत आहे. महवितरणची थकबाकी जर अशीच वाढत राहिली तर ते महावितरणच्या दृष्टीने धोक्याचे ठरणार आहे.

महावितरण ही जनतेची कंपनी असून तिला वाचविणे आणि सक्षम करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोविड-19 महामारीमुळे महावितरणची आर्थिक परिस्थिती अधिकच बिकड झाली असून तिला सक्षम करणे ग्राहक आणि आपल्या सर्वांची जबाबदारी आणि कर्तव्य आहे.  त्यामुळे आपण सर्वांनी आपआपल्या कार्य क्षेत्रातील थकबाकीदार ग्राहकांना थकबाकी भरण्यासाठी प्रोत्साहीत करुन महावितरणला सहकार्य करावे, जेणेकरुन महावितरण ही ग्राहकांना दर्जेदार आणि अखंड वीज सेवा सक्षमपणे देऊ शकेल.

Ajit pawar Assurance of Electricity cut suspension nitin raut cancelled

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Fraud News : बेरोजगारांच्या फसवणुकीचे मायाजाल! नोकरीचे आमिष दाखवून तरुण- तरुणींना लाखोंना गंडा

Latest Maharashtra News Updates : आमदार हेमंत पाटील यांच्या वक्तव्याविरोधात वंचित बहुजन आघाडीने केला निषेध

Viral Video: लहानपणीची गोष्ट खरी ठरली! ससा अन् कासवाची लावली स्पर्धा; ससा का हरतो? खरं कारण आलं समोर

Nashik News : सहकार वर्षानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीची महत्त्वपूर्ण बैठक

Hadsar Fort: हडसर गडावर सापडला इतिहासाचा अमूल्य ठेवा; गड संवर्धन मोहिमेत मिळाला फारसी शिलालेख

SCROLL FOR NEXT