Ajit Pawar Jayant Patil News Sakal
मुंबई

Ajit Pawar News: "राष्ट्रवादीचा भावी मुख्यमंत्री कोण?" जयंत पाटलांनंतर आता अजित पवारांच्या बॅनरमुळे चर्चांना उधाण

काही दिवसांपूर्वी जयंत पाटलांचेही असेच बॅनर्स लागले होते.

सकाळ डिजिटल टीम

NCP Ajit Pawar News: राष्ट्रवादीकडून होणाऱ्या बॅनरबाजीची सध्या सातत्याने चर्चा होत आहे. काही दिवसांपूर्वीच जयंत पाटलांच्या बॅनरची चर्चा होती, तर आता आज अजित पवारांमुळे चर्चा होत आहे. कारण म्हणजे या पोस्टरवरचा विशेष उल्लेख.

या पोस्टर्सवरती जयंत पाटील आणि अजित पवार यांना दोघांनाही भावी मुख्यमंत्री असं संबोधलं आहे. जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतल्या मलबार हिल भागात पोस्टर्स लागले होते. या पोस्टर्सवर जयंत पाटील यांचा उल्लेख 'भावी मुख्यमंत्री' असा करण्यात आला होता.

आता अजित पवारांना 'भावी मुख्यमंत्री' म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतल्या कार्यालयाबाहेर हे पोस्टर्स लागले आहेत. यामध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवारांचा उल्लेख करण्यात आला आहे. "महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री एकच दादा, एकच वादा अजित दादा", असा मजकूर या पोस्टरवर छापण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest Shivaji Park : अभिजित दिपके मुंबई पोलिसांच्या रडारवर? शिवाजी पार्कवरील आंदोलन बेकायदेशीर?; CJPच्या चार पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार

Latest Marathi News Live Update : दिवसभरात काय घडलं? देशविदेशातील घडामोडी वाचा एका क्लिकवर

MPSC Student Agitation Issue : एमपीएससी आंदोलनातील फूट; शिष्टमंडळाच्या परस्पर निर्णयाने विद्यार्थ्यांमध्ये संताप

Gangapur News : गंगापूर तालुक्यात खरीप हंगामच्या पंचनाम्याला वेग; दोन दिवसात १६ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्राचा पंचनामा पूर्ण

Satara District Bank Election : भाजप, राष्ट्रवादीने वाढवले उंडाळकरांचे टेन्शन! बाळासाहेब पाटलांसह भाजपचे तीन दिग्गज मैदानात; उमेदवारीचा दावेदार कोण याचीच उत्सुकता

SCROLL FOR NEXT