Ajit Pawar Speaks Over GST Returns  esakal
मुंबई

केंद्राने आधी GST परतावा द्यावा, मोदींच्या वक्तव्यानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

ओमकार वाबळे

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे महागाई आणि टॅक्सच्या संदर्भात आज माध्यमांना बोलत होते. काल पंतप्रधानांना भाजपेतर सत्ता असलेल्या राज्यात पेट्रोलच्या वाढत्या भावावरुन टोला लावला होता. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या या वक्तव्यावर उत्तर दिले आहे. (Ajit Pawar Speaks Over GST Returns)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल माध्यमांना बोलताना भाजपशासित राज्यात पेट्रोलचे भाव कमी आहेत आणि भाजपेतर राज्यात पेट्रोलचे भाव वाढलेले आहेत अशा राज्यांनी पेट्रोलवरील कर कमी करुन ग्राहकांनी दिलासा द्यावा असं म्हटलं होतं. त्यानंतर आज अजित पवार यांनी त्यांच्या या वक्तव्याचं उत्तर दिलं आहे.

मोदींच्या या वक्तव्याला उत्तर देताना ते म्हणाले की, केंद्राने जीएसटीचे पैसे थकवले आहेत, जीएसटीचे पैसे थकित असल्याने आम्हाला निर्णय घेणं भाग आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या टॅक्सपेक्षा महाराष्ट्राचा टॅक्स जास्त आहे. ज्यावेळी बाहेरून इंधन येतं, त्याच्यावर अधिक टॅक्स लागतो त्यामुळे केंद्र सरकारने इंधनावरील टॅक्स कमी करावा असं ते म्हणाले.

राज्याकडून केंद्राला कर जातो हे निर्विवाद सत्य आहे. म्हणून सरकारने केंद्राने टॅक्स कमी करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. त्याचबरोबर या गोष्टी २०१७ मध्येच सांगायच्या होत्या ना एवढ्या दिवस का थांबला असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. राज्यात आम्ही नव्याने कोणताही टॅक्स न लावता राज्यातील रिक्षाचालक टॅक्सी चालक आणि घरगुती गॅस वापरकर्त्यांना दिलासा दिलाय असं ते माध्यमांना बोलताना म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Schools Closed in India: देशात एक लाख प्राथमिक शाळा बंद; संसदेत गाजला मुद्दा, खरी परिस्थिती नेमकी काय आहे?

BEST Bus: बेस्टची महायोजना! ईस्टर्न फ्रीवे आणि अटल सेतूवर इलेक्ट्रिक डबल-डेकर बस धावणार, काय आहे नवा प्लॅन?

Quick Heal Story: दोनदा नापास... मोठी डिग्री नाही... 350 रुपयांच्या पगारावर काम करणाऱ्या पठ्ठ्याने उभी केली 800 कोटींची कंपनी

Latest Live Updates Marathi : नागपूरमध्ये अतिवृष्टी, दिवसभरात १७९ मिमी पावसाची नोंद, उद्या शाळांना सुट्टी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Bhokardan Police Action: भोकरदन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; बचत गटाच्या महिलांचे चोरी गेलेले ८.८० लाख परत

SCROLL FOR NEXT