मुंबई

मुंबई पोलिसांसाठी अक्षय म्हणून ठरला "हिरो' 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : आपल्या धडाकेबाज अभिनयाने लाखो प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करणारा अभिनेता अक्षय कुमार हा खऱ्याखुऱ्या जीवनातही हिरो आहे. त्याने देशावरील प्रत्येक संकटात सामाजिक बांधिलकी जपली आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवरही तो मदतीसाठी धावून आला आहे. मुंबई पोलिस फाऊंडेशनला त्याने दोन कोटी रुपयांची मदत केली आहे. या पोलिस दलातील दोन पोलिसांचा नुकताच कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अक्षयच्या या मदतीबद्दल मुंबईचे पोलिस आयुक्त पमबीर सिंग यांनी ट्‌विट करून आभार मानले. 

हे वाचा : या तारखेला भारत कोरोनामुक्त होणार

सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेल्या अक्षय कुमारने यापूर्वीही देशासाठी काम करणाऱ्या डॉक्‍टरांना मदत करण्यासाठी तीन कोटींची रक्कम दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपत्ती व्यवस्थापनाची कक्षा वाढवण्यासाठी, तसेच नागरिकांच्या सुरक्षेसंबंधी संशोधनासाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले होते. यानंतर अक्षय कुमारने 25 कोटींची मदत जाहीर केली होती.

त्यानंतर त्याने आता मुंबई पोलिसांच्या सुरक्षेसाठी दोन कोटी रुपये दिले आहेत. या रकमेचा वापर पोलिसांच्या सुरक्षेसाठी करण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्तांनी जाहीर केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: मुंबईतील १० रेल्वे स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू होणार; पण कोणत्या आणि सुविधा काय असणार? जाणून घ्या...

T20 World Cup : भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा सामना होणार; सूर्यकुमार यादवची टीम बघा कोणत्या तारखेला शेजाऱ्यांना परत हरवणार

सुजलेला चेहरा, वाढलेलं वजन आणि दाढी... राजकुमार रावला नक्की काय झालय? Viral Video

Latest Marathi News Update : 400 कोटी रुपयांच्या कथित कंटेनर चोरी प्रकरणी नवा ट्विस्ट,तक्रारदार संदीप पाटील यांचे पोलिसांवरच गंभीर आरोप

Horscope : उद्या 17 फेब्रुवारी! मंगळ देवाच्या कृपेने 3 राशींचे नशीब बदलणार; लगेच सुरू होतोय धनयोग, आरोग्याची मोठी समस्या संपणार

SCROLL FOR NEXT