Mango Myths esakal
मुंबई

Alfanso Mango: फळांचा राजा हापुस आला मुंबईच्या बाजारात

सकाळ डिजिटल टीम

Hapus Mango: कोकणातील हापूस आंब्यासारखा चवीला आणि रंगाला हुबेहूब दिसणाऱ्या आफ्रिका खंडातील मालावी देशाचा हापूस आंबा दिवाळीच्या मुहूर्तावर वाशीतील एपीएमसी मार्केटमध्ये डेरेदाखल झाला आहे. या आंब्याला प्रतिकिलो ४ हजार ते ५ हजार ५०० पर्यंत भाव मिळाला असून अवघ्या दहा मिनिटांत साडेपाचशे पेट्यांची विक्री झाली आहे.

आफ्रिका खंडात उन्हाळा सुरू असल्यामुळे मालावी देशातील हापूसचे आगमन झाले आहे. कोकणातील हापूसशी साधर्म्य असल्यामुळे या आंब्याला आफ्रिकेतही हापूस नावानेच संबोधले जाते. तीन ते सव्वा तीनशे किलो ग्रॅम वजनाचा हा आंबा खाण्यासाठी अगदी कोकणातील हापूस आंब्यासारखा लागतो.

त्यामुळे बाजारात आल्यावर ६०० बॉक्‍सची विक्री झाल्याची माहिती संजय पानसरे यांनी दिली. अशातच सध्या आफ्रिकेत १५ ऑक्‍टोबर ते १५ डिसेंबर या कालावधीत हापूसचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे डिसेंबरअखेरपर्यंत हा आंबा एपीएमसी मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहे. त्यानंतर मार्चमध्ये मात्र कोकणातील हापूस आंब्याचा हंगाम सुरू होणार असल्याने तोपर्यंत मालावीचा हापूस हा नवी मुंबईकरांसाठी पर्याय ठरणार आहे.

कोकणच्या हापूसची अफ्रिकेत लागवड

मालावीतील मँगो कंपनीने दहा वर्षांपूर्वी रत्नागिरी व दापोली येथील हापूस आंब्याच्या फांद्या आयात केल्या होत्या. या फांद्यांवर संशोधन करून त्यापासून आंब्याची कलमे तयार करून तब्बल ४५० एकर जागेत फळबाग केली. हा प्रयोग यशस्वी झाल्यावर आंबा विक्रीसाठी पाठवण्यास सुरुवात केल्याची माहिती फळ व्यापारी संजय पानसरे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Odisha Plane Crash : ओडीशामध्ये भीषण दुर्घटना! भुवनेश्वरहून राउरकेला जाणारे विमान कोसळले

DMart संक्रांती सेल! स्टील भांडी फक्त 29 रुपयांपासून; किराणासह वाण साहित्य खरेदीसाठी रांगा, सर्व डिस्काउंट ऑफर्स पाहा एका क्लिकवर

Ladki Bahin Yojana: मकर संक्रांतीला महिलांना ३,००० रुपये मिळणार? फक्त एकच अडचण; पण कोणती? जाणून घ्या...

Eknath Shinde: दोस्ती का महागठबंधन’चा महापौर असणार, उपमुख्यमंत्री शिंदे यांचा विश्वास

Latest Marathi News Live Update : आम्हाला मदत करण्यात सध्याच्या सरकारने मोठी भूमिका बजावली - गोविंदा आहुजा

SCROLL FOR NEXT