alibag 
मुंबई

अलिबाग हदरलं! चार नवे कोरोनाबाधित, जिल्हा रुग्णालयातील 2 वार्डबॉयचा समावेश

सकाळवृत्तसेवा

अलिबाग : अलिबाग तालुक्यातील चौघांना शनिवारी (ता. 30) कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये अलिबागमधील सरकारी रूग्णालयातील दोन वार्डबॉय तसेच मानकुळे व नवगाव येथील दोघांचा समावेश आहे. त्यामुळे अलिबाग तालुक्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 38 पर्यंत पोहचला आहे.

सरकारी रुग्णालयात काम करणाऱ्या दोघांना खोकल्यासह श्वास घेण्यास त्रास होत होता. त्या दोघांची तपासणी केली असता दोघांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. तसेच मानकुळे येथील कोरोनाबाधित रुग्ण 28 वर्षाचा तरूण असून तो पनवेल येथून आला होता. त्याला खोकल्यासह श्वास घेण्यास त्रास झाला. तर नवगाव येथील 45 वर्षीय महिला ठाणे येथून आली होती. तिला कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने अलिबागमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. तिची स्वॅब तपासणी केली असता तिला कोरोना झाल्याचा अहवाल प्राप्त झाला.

अलिबाग तालुक्यात आतापर्यंत 38 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून सातजण बरे झाले आहेत. सध्या 29 जणांवर उपचार सुरू असल्याचे तहसील कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

in Alibag Including four new corona positive, 2 wardboys from the district hospital

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव; यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीत मुसळधार पावसाची शक्यता

Maharashtra Farmers: पंचनामे कागदावर नको, थेट बांधावर करा; महसूलमंत्री बावनकुळे यांचे निर्देश; ग्रामसेवक, कृषी साहाय्यक, तलाठींची उपस्थिती बंधनकारक

आजचे पंचांग 24 सप्टेंबर 2026! प्रदोषामुळे खास दिवस; वाचा शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

Ahilyanagar Ganesh Visarjan : अहिल्यानगरमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत लाठीचार्ज; तरुणाचा मृत्यू, आमदार संग्राम जगताप यांचे ठिय्या आंदोलन

Jharkhand Dhuska Recipe: एकदा खाल तर पोहे-उपमाही विसराल! असा बनवा बाहेरून कुरकुरीत, आतून मऊ झारखंडी धुस्का

SCROLL FOR NEXT