Tobacco and Smoking is injuries to Health Sakal
मुंबई

Alibaug Police : तंबाखू खाणाऱ्यांची आता गय नाही! प्रशासनानं सुरु केली कारवाई, 'इतक्या' जणांविरोधात गुन्हा

तंबाखू (Tobacco) खाण्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.

सकाळ डिजिटल टीम

तंबाखूचे सेवन करणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिस व स्थानिक प्रशासनाच्या मदतीने कारवाई केली जात आहे.

अलिबाग : तंबाखू (Tobacco) खाण्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. याबाबत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत गावागावांत जनजागृती केली जाते. तरीदेखील काहीजण नियम धाब्यावर बसवून तंबाखू व अन्य तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात.

अशा एक हजार १६ जणांविरोधात जिल्हा प्रशासनाकडून कारवाई करून दोन लाख २२ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. जिल्ह्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम सुरू असून जिल्हा सामान्य रुग्णालयात यासाठी स्‍वतंत्र तैनात आहे.

शाळांपासून गावागावांत, सरकारी कार्यालयांत ठिकठिकाणी माहिती फलकाद्वारे प्रबोधन करण्यात येत आहे. तंबाखूसह धुम्रपानामुळेही आरोग्यावर परिणाम होत असल्‍याने जनजागृती करण्यात येत आहे. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे मुखाचा कर्करोग होण्याची शक्‍यता असते.

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मोफत सल्ला देणे, समुपदेशन करणे, मुख कर्करोगाची तपासणी करणे आदी उपक्रम डॉ. विकास पवार, सुशील साईकर, हितेश जाधव आदींच्या सहभागाने प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालयमार्फत सुरू आहेत.

तंबाखूचे सेवन करणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिस व स्थानिक प्रशासनाच्या मदतीने कारवाई केली जात आहे. आतापर्यंत एक हजार १६ जणांविरोधात कारवाई करण्यात आली असून दोन लाख २२ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केल्‍याची माहिती राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण विभागाकडून देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT