all senior and top most police officers in mumbai present for half yearly crime conference cm eknath shinde devendra fadnavis sakal
मुंबई

Mumbai News : मुंबईत राज्याच्या पोलीस दलाची अर्धवार्षिक परिषद संपन्न... मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

अर्धवार्षिक परिषदेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘’पोलीस आणि नागरिक हे परस्परांना पूरक आहेत.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय, कुलाबा येथील वरिष्ठ पोलीस अधिकारी अर्धवार्षिक परिषद सोमवारी संपन्न झाली. यावेळी राज्यातील पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी करणारी पोलीस स्टेशन आणि अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पोलीस दलातील प्रमुख अधिकारी अर्धवार्षिक परिषदेला उपस्थितीत होते.

याप्रसंगी राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक, अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रजनिश सेठ यांच्यासह राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. यावेळी कर्तव्य बजावताना उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना गौरविण्यात आले. अर्धवार्षिक परिषदेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘’पोलीस आणि नागरिक हे परस्परांना पूरक आहेत.

नागरिकांशी आपण संपर्क वाढविणे गरजेचे आहे.’’ तसेच, पोलिसांबद्दल लोकांना आदर आणि आधार वाटायला हवा. अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली.याशिवाय ‘’पोलीस, रुग्णवाहिका सेवा देणारे आणि अग्निशमन दल यांनी योग्य समन्वय साधला तर अधिक प्रभावीपणे काम करता येणे शक्य होईल.

आज परिषदेत राज्यातील सर्वच प्रमुख पोलीस अधिकारी एकत्र आले असून पोलीस दलाला अधिक सक्षम आणि संवेदनशील बनविण्यावर यावेळी चर्चा व्हावी.’’ अशी अपेक्षाही यावेळी बोलताना व्यक्त केली आणि पोलीस दल अधिक सक्षम बनविण्यासाठी शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: नववर्ष स्‍वागताच्या जल्लोषावर पोलिसांची करडी नजर; नियम मोडल्‍यास कारवाई

Latest Marathi News Live Update : नागपुरात वंचितची काँग्रेससोबत आघाडीत -बिघाडी

Indian Post: लिखित परीक्षा नाही! भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये स्टाफ कार ड्रायव्हर भरती; जाणून घ्या अर्ज करण्याची अंतिम मुदत काय?

नागपूर हादरलं! कुऱ्हाडीने वार करून पत्नी, चार वर्षाच्या मुलाची हत्या; जिल्ह्यात उडाली खळबळ, थरारक घटना..

BEST Bus Accident : लोक खरेदी करत होते, तेवढ्यात बस आली अन्...; भांडूप बस अपघाताचा CCTV VIDEO समोर

SCROLL FOR NEXT