मुंबई

उपनगरी गाड्यांमधून प्रवासाची वर्तमानपत्र विक्रेत्यांना संमती द्या, विक्रेत्यांची महापौरांकडे मागणी

कृष्णा जोशी

मुंबई: नागरिकांकडे माहितीचे साधन अर्थात वृत्तपत्रे पोहोचविणाऱ्या विक्रेत्यांना उपनगरी रेल्वेतून प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांच्या संघटनांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे केली आहे. 

सध्या मुंबईत उपनगरी रेल्वेगाड्या सुरु असल्या तरी त्यात फक्त अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांनाच प्रवासाची परवानगी आहे. सरकारने वर्तमानपत्रे जरी अत्यावश्यक सेवा म्हणून घोषित केली असली तरी वर्तमानपत्र विक्रेत्यांना उपनगरी रेल्वे प्रवासाची परवानगी नाही. नुकतेच सरकारने मुंबईतील डबेवाल्यांना रेल्वे प्रवासाची संमती दिली आहे. त्या धर्तीवर आम्हालाही संमती द्यावी, अशी मागणी बृहन्मुंबई न्यूजपेपर्स व्हेंडर्स असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे.

वर्तमानपत्र विक्रेत्यांना उपनगरी रेल्वेगाड्यांमध्ये प्रवेश नसल्याने त्यांना त्यांच्या दैनंदिन कामात भरपूर अडचणी सहन कराव्या लागत आहेत. नागरिकांना सकाळी वर्तमानपत्रे वेळेत पोहोचविणे गरजेचे असते. बरेचसे विक्रेते मुंबईबाहेर लांब उपनगरांमध्ये रहात असल्याने त्यांना रेल्वेच सोयीची आहे. रस्तेमार्गाने जावे तर पहाटे बस किंवा एसटी सेवा सुरुही नसतात आणि रस्त्याने वेळही भरपूर लागतो. खासगी वाहनाने जावे तर मोठाच खर्च होतो. त्यामुळे वर्तमानपत्र विक्रेत्यांना रेल्वेप्रवासाची परवानगी द्यावी, अशी मागणी असोसिएशनचे विश्वस्त जीवन भोसले यांनी महापौरांकडे केली. 

वर्तमानपत्र विक्रेत्यांची ही मागणी आपण सरकारकडे पाठविली असून यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिल्याचे महापौरांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. तर वर्तमानपत्र विक्रेत्यांना उपनगरी रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी सरकारने द्यायला हवी, असे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

---------------

(संपादनः पूजा विचारे)

Allow Newspaper vendors traveling in suburban trains vendors demand to mayor

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT