मुंबई

चाकरमान्यांना गावी येण्यासाठी परवानगी द्या! माणिक जगताप यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा


अलिबाग: लॉकडाऊनच्या काळात कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी सरकारने परवानगी देणे आवश्यक असून रेल्वे सेवाही चालू करावी, अशी मागणी माजी आमदार माणिक जगताप यांनी केली आहे. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत निवेदन दिले आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून महाविकास आघाडीचे सरकार आणि सरकारी यंत्रणा अत्यंत समर्थपणे लढा देत आहे. अडकून पडलेल्या परराज्यातील नागरिकांना त्यांच्या मूळगावी जाण्यासाठी सरकारने विशेष सोय केली. तर केंद्राने विशेष रेल्वे गाड्या सोडल्या. रेल्वेस्थानकापर्यंत जाण्यासाठी राज्य सरकारने त्यांच्यासाठी मोफत एसटी बस सेवाही उपलब्ध करून दिली आहे. परंतु, राज्यातील विविध भागांतील नागरिक मुंबई व अन्य ठिकाणी अडकून आहेत. ही मंडळी लहानशा खोलीत राहत असून त्यांच्यावर उपासमार होत आहे. त्यांच्या मूळगावी जाण्यासाठी ते धडपड करत आहेत. परंतु, सरकारकडून त्यांना परवानगी दिली जात नाही. त्यामुळे काही जण चालत गावी येऊ लागले आहेत. 

कोकणात पायी जाणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल  होत आहेत. त्यात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे सरकारने गांभीर्याने लक्ष देऊन कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी वाहनांची सोय करून द्यावी. तसेच रेल्वे सेवा सुरू करावी, जेणेकरून त्यांना त्यांच्या गावी सुरक्षित पोहचता येईल, अशी मागणी माजी आमदार माणिक जगताप यांनी केली आहे.

एक लाखाची मदत 
कोरोनावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला मदत म्हणून माजी आमदार माणिक जगताप यांनी मदतीचा हात दिला आहे. दोन महिन्यांतील एक लाख रुपयांची पेंशन त्यांनी धनादेशाच्या स्वरूपात जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे सुपूर्द केली. जगताप यांनी मदत केल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Booking Rules : एलपीजी बुकिंगच्या नियमात मोठा बदल, आता ३५ दिवसांनंतरच बुक करता येईल सिलिंडर

Gas Cylinder Shortage Impacts Small Businesses : धक्कादायक! गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे त्रस्त झालेल्या हॉटेल व्यावसायिकानं हॉटेलमध्येच घेतला गळफास

Ajit Pawar Plane Crash : अजित पवार अपघातप्रकरणी नवी अपडेट समोर, सहवैमानिकाचे ‘ओह शीट’ उद्‍गार; कटकारस्थान केल्याचा गंभीर आरोप

Chhatrapati Sambhajinagar:‘आदर्श’मध्ये अजूनही ३३८ कोटी अडकलेले ; साडेतीन वर्षांत दहा टक्केही कर्ज वसुली नाही

Chhatrapati Sambhajinagar: दोन कोटी लिटर पाणी आले पाइपलाइनमध्ये दुसऱ्या दिवशीही चाचणी : संत एकनाथ साखर कारखान्यापर्यंत पोचले पाणी

SCROLL FOR NEXT