File Photo
File Photo 
मुंबई

विनाअपघात सेवा बजावणाऱ्या चालकाचा असाही सन्मान

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ११ : एसटी महामंडळात चालक म्हणून १२ वर्षे विनाअपघात सेवा बजावणारे अन्सार शेख यांच्या वाढदिवसानिमित्त रस्ता सुरक्षा अभियान घेण्यात आले. महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने हा आगळावेगळा उपक्रम राबवला. या वेळी त्यांनी 
एसटी चालक आणि वाहकांना मार्गदर्शन केले.

नालासोपारा एसटी आगारात १२ वर्षांपासून बसचालक म्हणून कार्यरत असलेले अन्सार शेख यांनी आपल्या हातून एकही अपघात घडलेला नसल्याचे सांगितले. देशभरात सुरू होणाऱ्या ३१ व्या रस्ता सुरक्षा अभियानाचे औचित्य साधून शेख यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसच्या बैठकीत रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रम झाला. या वेळी शेख यांनी रस्ता सुरक्षेचे महत्त्व सांगितले.

देशभरात ११ ते १७ जानेवारीदरम्यान रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येणार आहे. महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसच्या नालासोपारा आगार युनिटने शेख यांच्या वाढदिवसानिमित्त रस्ता सुरक्षा अभियान राबवल्याबद्दल कौतुक केले जात आहे.
या वेळी एसटी कर्मचारी संघटनेचे केंद्रीय सरचिटणीस श्रीरंग बर्गे, विभागीय अध्यक्ष प्रकाश पाटील, विभागीय सचिव कमलाकर जोशी, प्रादेशिक सचिव श्रीकांत आढाव, शिवसेना नालासोपारा शहरप्रमुख संतोष टेंबवलकर, वसई काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष रतन तिवारी व एसटी कर्मचारी उपस्थित होते.

देशभरातील प्रवासी वाहतुकीत सुरक्षिततेच्या संदर्भात महाराष्ट्रातील एसटी चालकांचे प्रशिक्षण, कामगिरी, शारीरिक-मानसिक तंदुरुस्ती निश्‍चितच उजवी आहे. त्यामुळे प्रतिकिलोमीटर अपघाताचे प्रमाण फक्‍त ०.१७ टक्के आहे, असे एसटी कर्मचारी संघटनेचे केंद्रीय सरचिटणीस श्रीरंग बर्गे म्हणाले. अन्य वाहनचालकांच्या चुकीमुळे झालेल्या अपघातांचे प्रमाण ९० टक्के आहे, असे त्यांनी सांगितले.

Also, the honor of being the driver of a casual service

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare : "मिस्टर राज, तुम्हाला माझ्या नावाची सुपारी..." सुषमा अंधारे यांचा लाव रे तो व्हिडीओवरून हल्लाबोल

Raj Thackeray : राज ठाकरेंचा पुन्हा एकदा 'लाव रे तो व्हिडीओ', सुषमा अंधारेंचा जुना व्हिडीओ दाखवून उद्धव ठाकरेंना सवाल

Ravindra Dhangekar : भाजपकडून पुण्यात पैसे वाटल्याचा आरोप, काँग्रेस उमेदवार धंगेकरांचं पोलिस ठाण्यात धरणे आंदोलन

Loksabha election : निवडणूक किस्सा! अमिताभ बच्चन उमेदवार अन् लिपस्टिकच्या खुणा असलेल्या चार हजार मतपत्रिका...

IPL 2024 RCB vs DC : आरसीबीची विजयी पंचमी; दिल्लीच्या पराभवाने पॉईंट टेबल झालं रंजक

SCROLL FOR NEXT