KEM hospital sakal media
मुंबई

मुंबईतील पहिले 'मेमरी क्लिनिक' केईएम रुग्णालयात सुरु

भाग्यश्री भुवड

मुंबई : मुंबईसह राज्यभरात अल्झायमर आणि स्मृतीभ्रंशाच्या (alzheimer and amnesia) रुग्णांच्या संख्येत वाढ (patients increases) जाणवत आहे. यासाठी पालिका रुग्णालयामध्ये (bmc hospital) ‘मेमरी क्लिनिक’ (memory clinic) सुरु करण्याचा निर्णय घेतला असून मुंबईतील सर्वात मोठ्या पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांपैकी एक केईएम रुग्णालयात (kem hospitals) मेमरी क्लिनिक सुरु करण्यात आले आहे.

केईएम रुग्णालयातील हे मुंबईतील पहिले मेमरी क्लिनिक आहे. आर्युमानात वाढ झाल्याने अल्झायमर आणि स्मृतीभ्रंशाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. केईएम रुग्णालयात दर आठवड्याला 15 रुग्ण या समस्यांनी ग्रस्त असलेले दाखल होतात. सामाजिक भीतीपोटी बरेच रुग्ण उपचारासाठी पुढे येत नाहीत. यासाठी पालिकेने पुढाकार घेतला आहे. या क्लिनिकद्वारे रुग्णांच्या स्मरणशक्तीची विविध चाचण्यांच्या माध्यमातून तपासणी करण्यात येईल. स्मरणशक्ती विषयी येणाऱ्या अडचणींचे अवलोकन करून त्यांचे वर्गीकरण केले जाईल. त्यानंतर रुग्णावर औषधोपचार करण्यात येईल. शिवाय, स्वत: च्या जीवनात ही व्यक्ती स्वतंत्र झाली पाहिजे यासाठी प्रयत्न केले जातील.

काय आहे मेमरी क्लिनिक ?

मेमरी क्लिनिक हे एक मल्टिडिस्पलनरी टीम असलेले केंद्र आहे. ज्यात डायमेंशिया म्हणजेच अल्झायमर आणि स्मृतीभ्रंशाच्या रुग्णांचे  निदान आणि सर्वतोपरी उपचार जसे की, वैद्यकीय सुविधा, रुग्णांना मानसिक आणि सामाजिक आधार , त्यांचे पुनर्वसन केले जाते. ज्यांना वारंवार विसरण्याचा त्रास असतो किंवा काही गोष्टी लक्षात राहत नाहीत, किंवा शब्द जोडण्यात अडचणी येतात, प्रत्येक कामात अडचणी जाणवतात, आणि या सर्वाचा कार्यक्षमतेवर होणारा परिणाम. अशा जर अडचणी लहान मुलांना किंवा कोणत्याही सामान्य माणसाला जाणवत असतील तर तेव्हा उपचारांची गरज भासते.

डिमेंशिया हा जगभरातील प्रमुख सार्वजनिक आरोग्य समस्यांपैकी एक आहे. त्याचा भार वर्षानुवर्षे वाढत आहे. अंदाजानुसार, भारतात 5 दशलक्ष रुग्ण स्मृतिभ्रंशाने ग्रस्त आहेत. 2030 पर्यंत ती संख्या दुप्पट होऊ शकते. डिमेंशिया इंडियाच्या अहवालानुसार, महाराष्ट्रात स्मृतिभ्रंशाचे प्रमाण 2006 मध्ये 2,77,000 वरून 2021 मध्ये 50,10, 00पर्यंत वाढले आहे. भारतातील तरुण लोकसंख्येचा मोठा भाग असल्याने, पुढील दोन वर्षांमध्ये लोकांचे वय वाढल्याने डिमेंशियामुळे अजून भार वाढेल. या क्लिनिकमध्ये जे रुग्णांची काळजी घेतात अशा लोकांनाही प्रशिक्षण दिले जाईल. शिवाय, त्यांचे समुपदेशन ही केले जाईल.  त्यांची काळजी कशी घ्यायची? याबाबत ची माहिती दिली जाईल असेही डॉ. रावत यांनी सांगितले.

"डिमेंशियाचे आठवड्याला किमान 10 ते 15 रुग्ण ओपीडिसाठी येतात. यात ही बरेचसे प्रकार आहेत, एका वर्षात किमान 150 ते 200 रुग्ण दाखल होतात. ज्यात फाॅलो अपचे रुग्ण ही असतात. मेमरी क्लिनिकमध्ये रुग्णांचे पुनर्वसन, त्यांचे उपचार, मानसिक आधार आणि योग्य निदान केले जाणार आहे. त्यांच्या भविष्याच्या दृष्टीकोनातुन हे क्लिनिक खूप महत्वाचे आहे."

- डाॅ. संगीता रावत, न्यूरोलॉजिस्ट आणि विभाग प्रमुख, केईएम रुग्णालय

"रुग्णालयात मेमरी क्लिनिक सुरू करण्यात आले असून विसरणे ही  देखील समस्या आहे. अल्झायमर किंवा डिमेंशिया या आजाराच्या निदान आणि उपचारांसाठी हे क्लिनिक असेल. केईएम रुग्णालयात डे केअर सेंटर ही सुरू करण्यात येणार आहे."

- डाॅ. हेमंत देशमुख, अधिष्ठाता, केईएम रुग्णालय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Made in India semiconductor chip: मोदींची मोठी घोषणा! '’वर्षअखेरीस पहिली ‘मेड इन इंडिया’ सेमीकंडक्टर चिप बाजारात येणार'’

Uddhav Thackeray : पाकशी क्रिकेटसाठी परवानगी का? पहलगामच्या वेळी भूतदया कुठे गेली होती

ST Bus: कोकणवासीयांचा प्रवास अधिक सुखद! १९५ एसटी बस पनवेलमध्ये दाखल

Ganeshotsav: गणेशोत्सवनिमित्त हायवेवरील हॉटेल-ढाबा चालकांना पोलीस प्रशासनाच्या सूचना

MP Supriya Sule : ‘मी मटण खाल्लेले पांडुरंगाला चालते’

SCROLL FOR NEXT