मुंबई

आता ऍमेझॉन आक्रमक, मनसे कामगार सेना आणि अध्यक्ष राज ठाकरेंना दिंडोशी कोर्टाची नोटीस

सुमित बागुल

मुंबई : मराठी भाषेवरून कायम आवाज उठवणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेविरोधात ऍमेझॉनने आता कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. त्यामुळे आता मनसे विरुद्ध ऍमेझॉन हा वाद चिघळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 'नो मराठी, नो ऍमेझॉन' मोहीम सुरु केली आहे. याविरोधात ऍमेझॉनने कोर्टात धाव घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसे कामगार सेनेला नोटीस बजावली आहे. दिंडोशी कोर्टाने याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला येत्या ५ जानेवारीला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. 

काय आहे प्रकरण आणि कोर्टाने नोटीशीत काय म्हटलंय ? 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ई-कॉमर्स साईट्स ऍमेझॉन आणि फ्लिपकार्टवर मराठी भाषेचा अंतर्भाव केला जावा यासाठी दोन्ही कंपन्यांना निवेदन दिले होते. दरम्यान, मराठी भाषा या साईट्स आणि ऍपवर आली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण स्टाईलने आंदोलन देखील करू असा इशाराही संबंधित कंपन्यांना दिला होता. आता दिंडोशी कोर्टामार्फत धाडण्यात आलेल्या नोटिशीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांना ऍमेझॉन कार्यालयाच्या १०० मीटर परिसरात उपस्थित राहण्यास मज्जाव करण्यात आला आहे, असं या नोटिशीत म्हंटल आहे. तर याबाबत ५ जानेवारीला इच्छा असल्यास राज ठाकरे कोर्टात उपस्थित राहू शकतात असं देखील या नोटीशीत कोर्टाने म्हंटलं आहे. 

ऍमेझॉनने दाक्षिणात्य भाषांना प्राधान्य देत आपली वेबसाईट आणि मोबाईल ऍप्लिकेशनवर स्थान दिलं आहे. या पार्श्वभूमीवर मनसे आक्रमक झाली आहे. मनसेतर्फे ऍमेझॉन विरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्यात येतेय यानंतर आता ऍमेझॉनने थेट कोर्टात धाव घेतली आहे. 

amazon vs maharashtra navanirman sena conflict MNS gets notice from dindoshi court

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Mumbai Protest: मुंबईत 'सीजेपी'चा एल्गार! मंत्रालयाबाहेर 'जेन नेक्स्ट' एकवटले; अभिजित दीपकेंचं मोठं विधान, म्हणाले...

Maharashtra Politics : भाजप, शरद पवार गटाला मोठे खिंडार, माजी मंत्र्यांच्या नातीसह शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Raj Thackeray: मुंबई पोलिसांच्या विनंतीला मान देत...; ठाकरे बंधूंच्या 'गर्जना' मोर्चाच्या मार्गात बदल, राज ठाकरेंची महत्त्वाची माहिती

LPG-PNG Gas Connection: सिलिंडर संपण्याची चिंता मिटणार! आता घरातच मिळणार गॅस; सरकारची मोठी मोहीम, घरबसल्या असा करा अर्ज

IND vs PAK, Asian Games : मोहसिन नक्वीला 'अपमान' डोळ्यासमोर दिसला, भारत-पाकिस्तान लढतीपूर्वीच पळ काढला; नेमकं काय केलं?

SCROLL FOR NEXT