corona sakal media
मुंबई

अंबरनाथ : कुटुंबियांसह परदेशातून आलेल्या सात वर्षीय मुलीला कोरोनाची बाधा

श्रीकांत खाडे

अंबरनाथ : कुटुंबियांसह रशियामध्ये (Russia) जाऊन परत अंबरनाथला (Ambarnath) आलेल्या एका सात वर्षीय मुलीला कोरोनाची बाधा (Child corona positive) झाल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. अंबरनाथला राहणारी सात वर्षीय मुलगी (Seven year old girl) तिच्या आई, वडिलांसमवेत रशियामध्ये फिरण्यासाठी गेली होती. रशियात  फिरण्यास गेलेले कुटुंब 28 नोव्हेंबरलाच अंबरनाथला घरी परत आले. त्यानंतर मुलीला त्रास जाणवू लागल्याने तिची कोविड चाचणी (corona test) केली असता ती पॉझिटिव्ह आढळली.

तर मुलीच्या वडिलांची टेस्ट निगेटिव्ह आली असून तिच्या आईचा टेस्ट अहवाल येणे बाकी असल्याचे समजते. त्या मुलीची आई दोन दिवस ऑफिसमध्ये जाऊन आली आहे. याबाबत माहिती मिळताच मुलीचे नमुने ओमिक्रॉन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार असल्याची आणि सध्या मुलगी आणि तिचे कुटुंबीय घरीच क्वारंटाईन करून ते रहात असलेली इमारत सील करण्यात येणार असल्याची माहिती नगरपालिकेचे अतिरिक्त मुख्याधिकारी डॉ. धिरज चव्हाण यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT