Ambulance Strike Sakal media
मुंबई

रायगड : अखेर जिल्ह्यातील 108 क्रमांकावरील रुग्णवाहिका थांबली

सकाळ वृत्तसेवा

पाली : नियमित वेतन, कोरोना काळातील बोनस आणि पगारवाढीसाठी (salary increment) रायगड (Raigad) जिल्ह्यातील १०८ क्रमांक रुग्णवाहिका (Ambulance stops) चालकांनी गेल्या महिन्यात संबंधित विभागाला निवेदन दिले होते. मात्र यावर २१ दिवसांनंतरही कोणताच तोडगा न निघाल्याने बुधवारी (ता.६) सायंकाळपासून जिल्ह्यातील रुग्णवाहिका चालकांनी (indefinite strike) बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले.

रायगड जिल्ह्यातील १०८ क्रमांकाच्या २३ रुग्णवाहिका असून ५५ रुग्णवाहिका चालक आहेत. हे रुग्णवाहिका चालक (पायलट) २०१४ पासून बीव्हीजी इंडिया कंपनीमध्ये कंत्राटी रुग्णवाहिका चालक म्हणून कामावर रुजू आहेत. २०१४ पासून आजपर्यंत किमान वेतनात एकही रुपयाची वाढ झालेली नाही. संबंधित अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत मागण्यांसंदर्भात कोणतेच निर्णय झाले नाहीत. त्यामुळे अखेर रुग्णवाहिका चालकांसमोर काम बंद आंदोलनाशिवाय पर्याय राहिला नाही. दरम्यान, काम बंद आंदोलन सुरू केलेले असले तरी हे रुग्णवाहिका चालक गर्भवती आणि अपघातग्रस्तांना सेवा देणार आहेत.

रायगड जिल्ह्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही अधिकाऱ्यांनी आमच्याशी चर्चा केली नाही. आमच्या मागण्यांचा विचारही केला नाही. आम्ही अजूनही आमच्या मागण्यांबाबत योग्य निर्णय घेणाऱ्या मोठ्या अधिकाऱ्यांसोबत चर्चेस तयार आहोत.

- ज्ञानेश्वर जगताप, उपाध्यक्ष, १०८ रुग्णवाहिका संघटना, रायगड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT