मुंबई

मुंबईतल्या पोरांनी केली कमाल, दहावीच्या निकालांमध्ये गेल्या सहा वर्षात जे घडलं नाही ते यंदा घडलंय...

तेजस वाघमारे

मुंबई : दहावी निकालात मुंबई विभागीय मंडळाचा निकाल 96.72 टक्के लागला आहे. हा निकाल गेल्या सहा वर्षातील सर्वाधिक निकाल आहे. यंदा मुंबई विभागातील 1 लाख 8 हजार 49 विद्यार्थांना 75 टक्केहून अधिक गुण मिळाले आहेत. गेल्या वर्षी अंतर्गत गुण रद्द केल्याने त्याचा फटका विद्यार्थ्यांसोबत विभागाच्या निकालावरही झाला होता. मात्र यंदा विद्यार्थाना अंतर्गत गुण देण्यात आल्याने विद्यार्थांबरोबरच मंडळाचा निकालही वाढला आहे.

  • मुंबई विभागीय मंडळातून 3 लाख 32 हजार 746 विद्यार्थांनी परीक्षेची नोंदणी केली होती.
  • यापैकी 3 लाख 31 हजार 136 विद्यार्थांनी परीक्षा दिली होती 
  • त्यापैकी 3 लाख 20 हजार 284 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत 
  • एकूण 1 लाख 8 हजार 49 विद्यार्थांना 75 टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत 
  • तर 1 लाख 17 हजार 819 विद्यार्थांना 60 टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत  
  • 45 टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आहे 74 हजार 863 इतकी आहे
  • तर 19 हजार 553 विद्यार्थांना 35 टक्क्यांपेक्षा गुण  मिळाले आहेत.

2015 मध्ये मुंबई मंडळाचा निकाल 92.90 टक्के, 2016 मध्ये 91.90 टक्के, 2017 मध्ये 90.09, 2018 साली 90.41 टक्के, 2019 मध्ये 77.04 टक्के आणि 2020 मध्ये सर्वाधिक 96.72 टक्के लागला आहे.

मुंबई मंडळात पूर्व उपनगरची बाजी

मुंबई विभागीय मंडळात सर्वाधिक निकाल हा पूर्व उपनगरचा लागला असून 97.30 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्या खालोखाल बृहन्मुंबईचा 97.10, मुंबई उपनगर-2 चा 96.50 टक्के, ठाणे जिल्ह्याचा 96.61 टक्के आणि सर्वात कमी निकाल हा रायगड जिल्ह्याचा 96.07 टक्के इतका आहे.

राज्यातील 8 हजार 360 शाळांचा निकाल 100 टक्के

2015 नंतर यावर्षी दहावीच्या निकालाची टक्केवारी 90 हून अधिक आहे. यंदा राज्यातील तब्बल 83 हजार 262 विद्याथ्र्यांना 90 टक्के व त्यापेक्षा जास्त गुण मिळाले असून गेल्यावर्षीपेक्षा ही संख्या कित्येक पटीने जास्त आहे. तर 22 हजार 570 शाळांपैकी 8 हजार 360 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे.

मुलींची आघाडी

राज्यात मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाणही जास्त आहे. यंदा मुलींचा निकाल 96.91 तर मुलांचा निकाल 93.90 टक्के लागला आहे. मुलींचा निकाल मुलांपेक्षा 3.01 टक्क्यांनी अधिक आहे.

( संकलन - सुमित बागुल )

amid corona percentage of overall SSC student passing from mumbai is highest in last six year

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Cash Withdrawal: आता कॅशसाठी एटीएममध्ये जाण्याची गरज पडणार नाही, स्कॅन करताच रोख रक्कम हातात येईल, पण कसं?

IND vs PAK, Asia Cup: भारतानं हस्तांदोलन टाळलं, पण पाकिस्तानची कारवाई आपल्याच अधिकाऱ्यावर; पदावरूनच केलं बडतर्फ

Latest Marathi News Updates : वंजारा-बंजारा एक आहे, या धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक

Saurabh Bharadwaj Challenge SuryaKumar Yadav : ‘आप’चे नेते सौरभ भारद्वाज यांचं सूर्यकुमार यादवला चॅलेंज अन् टोमणेही मारले!

Bathing Tips for Good Health: स्वच्छतेसोबत आरोग्यही जपा – आंघोळ करताना फॉलो करा या महत्त्वाच्या टिप्स!

SCROLL FOR NEXT