मुंबई

वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर NMMC कडून कडक निर्बंध; जाणून घ्या नियमावली

सुजित गायकवाड

नवी मुंबई : शहरातील वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांवर नियंत्रण आणण्यासाठी अखेर महापालिकेने खाजगी सोहळे आणि राजकीय कार्यक्रमांतील गर्दीवर निर्बंध आणले आहेत. 28 फेब्रुवारीपासून कार्यक्रमांमध्ये 50 पेक्षा जास्त नागरीक गोळा झाल्यास आयोजकांवर दंडात्मक कारवाईसह गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 28 फेब्रुवारीपासून रात्री 12 नंतर कन्टेन्मेंट झोनमध्ये कठोर लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नागरीकांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. 

जानेवारीपर्यंत शहरातील कोरोनाला बऱ्यापैकी आटोक्‍यात आणण्यात महापालिकेच्या आरोग्य विभागाला यश आले होते. मात्र टाळेबंदी शिथिल केल्यानंतर पुन्हा एकदा कोरोनाने डोकेवर करण्यास सुरूवात केली आहे. रस्त्यावर, बाजारपेठांमध्ये आणि मॉल्समध्ये येणाऱ्या नागरीकांकडून नियमांचे भंग होत आहे. परिणामी शहरातील रुग्णवाढ होत असल्याचे निदर्शनास आल्याने पालिका प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत.

लग्नकार्य आणि इतर खागजी सोहळ्यांमध्ये उपस्थितीत नागरीकांच्या संख्येवर मर्यादा आणल्या आहेत. खुले लॉन्स, मंगल कार्यालये, सभागृहे, बॅंक्वेट व इतर मॉल्स याठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये 50 पेक्षा जास्त नागरीकांना उपस्थित राहण्यास मनाई करण्यात आली आहे. 50 व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्ती हजर असल्यास संबंधित आयोजकासह सभागृहाच्या मालकांवर 50 हजार रूपयांच्या दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच गरज पडल्यास गुन्हे दाखल करण्याचे आदेश बांगर यांनी दिले आहे. 

शहरातील राजकीय गर्दीला चाप 

नवी मुंबई महापालिकेच्या निवडणूका पाहता शहरात रोजच्या रोज हळदी-कूंकू आणि जनसंपर्क कार्यालयांची उद्घाटने होत आहे. या कार्यक्रमात शक्तीप्रदर्शन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात महिला व पुरूषांची गर्दी होत असते. या गर्दीत सहभागी होणाऱ्या बरेच कार्यकर्ते तोंडावर मास्क, हाताला सॅनेटाईज आणि सोशल डिस्टसिंग पाळत नाहीत. मात्र महापालिकेच्या या निमावलीमुळे गर्दी करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. 

amid increasing numbers of corona strict rules and regulations implemented in navi mumbai 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT